मुंबई – महाविकास आघाडीत डॅमेज कंट्रोल सुरू आहे का, असा प्रश्न मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींवरून दिसत आहे. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यापूर्वीच भाजप आक्रमक झाला असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधींना इशारा दिला आहे.
राहुल गांधी मातोश्रीवर येणार असल्याचं सांगण्यात येत असून यावरून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माफी मागितल्याशिवाय राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही. पाचवेळा जाणीवपूर्वक राहुल गांधींनी सारवकराचं अवमान केला. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यपूर्वी सावरकरांविषयी केलेल्या विधानावर माफी मागावी, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला तर बघा, असं आव्हान पटोले यांनी दिलं. तसेच आधी सावरकर वाचा, असं म्हणत पटोले यांनी बावनकुळेंची खिल्ली उडवली.