उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने गुन्हेगारांविरोधात मोहिम उघडली आहे. उमेश पाल हत्याकांडानंतर नुकतेच अतिक अहमद याचा मुलाचे एसटीएफने गुरूवारी एन्काऊंटर केलं. मात्र योगी सरकारच्या सहा वर्षात झालेल्या एन्काऊंटर्सची आकडेवारी विचार करायाला भाग पाडणारी आहे. यूपीमध्ये योगी सरकारच्या मागील सहा वर्षांच्या काळात आतापर्यंत तब्बल ११०,९३३ एन्काऊंटर करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात झालेल्या या एन्काऊंटरमध्ये आतापर्यंत तब्बल १८३ कुख्यात गुन्हेगारांना ठार करण्यात आले आहे. तर पोलिसांची गोळी लागून ५,०४६ गुन्हेगार जखमी होऊन पकडले गेले आहेत. तर आतापर्यंतच्या एकूण चकमकीनंतर २३,३४८ गुन्हेगारांना अटक करण्यात आले आहे. या तुलनेत १३ पोलिस कर्मचाऱ्यांना देखील यादरम्यान जीव गमवावा लागला असून १,४४३ पोलीस जखमी झालेत.

अधिक वाचा  फडणवीस सरकारचा बाजार समित्यांबाबत एकच मोठा निर्णय; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही झोपच उडाली

सर्वाधित एन्काऊंटर कुठे झाले?

उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त एन्काऊंटर हे मेरठ परिसरात झाले आहेत. जिल्ह्यात एकूण सहा वर्षात ३,२०५ एन्काऊंटरच्या घटना घडल्या. यामध्ये ६४ आरोपी मारले गेले तर १७०८ जखमी झाले. तर एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर ४०१ पोलीस जखमी झाली. पोलीसांसोबत झालेल्या चकमकीनंतर ५९६७ आरोपींना अटक करण्यात आले. यानंतर सर्वाधिक एन्काऊंटर हे आग्रा येथे झाले आहेत. आग्र्यामध्ये १८४४ एन्काऊंटर झाले असून यामध्ये १४ आरोपी ठार झाले.

दरम्यान अदसच्या एन्काऊंटरनंतर सीएम योगी यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ गुंडाना संपणार असल्याचे सांगत आहेत. त्यांनी मिट्टी मे मिला देंगें हे वाक्या बरंच चर्चेत आलं होतं. उमेश पाल हत्याकांडानंतर विरोधीपक्षांवर टीका करताना सीएम योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत ‘माफिया को मिट्टी में मिला देंगे’ असं म्हटलं होतं.

अधिक वाचा  पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण