पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुर्वी झालेल्या भांडणातून चौघांनी मिळवुन युवकास लोखंडी कोयता, हॉकी स्टीक व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना वडकी येथील फिल्ड गार्ड कंपनीच्या समोर बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडली.याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणव संतोष निगडे आणि त्याच्या इतर तीन साथीदारांविरूध्द लोणी काळभोर पोलिस ठाण्यात भादंवि 326, 323, 504, 506, 34 सह म पो अधि 37 (1) (3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात ज्ञानेश महादेव म्हेत्रे (20, रा. मु.पो. दिवे, पुरंदर – ) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश म्हेत्रे हे त्यांच्या मोटारसायकलवरून घरी जात होते. त्यावेळी पुर्वी झालेल्या भांडणातून आरोपी प्रणव संतोष निगडे
आणि त्याच्या इतर साथीदारांनी हातात लोखंडी कोयता, हॉकी स्टकी व लाकडी दांडके घेवुन ज्ञानेश यांच्या डोक्यात, डाव्या हातावर व डाव्या खांद्यावर मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात ज्ञानेश म्हेत्रे हे गंभीर जखमी झाले. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तरटे करीत आहेत.