महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खऱ्या अर्थाने रुजवण्याचा व त्यांचा मूलमंत्र शिका संघटित व्हा संघर्ष करा शासनकर्ती जमात बना हा प्रत्यक्षात उतरवण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या वतीने व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने होत असल्याचे प्रतिपादन श्री राजेंद्र पवार ची फॅब्रिकेशन महावितरण कंपनी पुणे जिल्हा यांनी व्यक्त केले निमित्त होते ग्रंथालयाच्या वतीने सलग 12 तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री राजेंद्र पवार यांच्या हस्ते तसेच मंडलाधिकारी पुणे शहर महाराष्ट्र शासन श्री शंकर ठुबे यांच्या हस्ते पार पाडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रीन सोल्युशन कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख सागर आईवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड विभाग श्री राजेंद्र गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजीत जाधव,पीएसआय श्री अक्षय गोरड,पीएसआय श्री धनवडे, एमएसईबीचे श्री अनिरुद्ध कुलकर्णी, सीआयडीएच्या करिष्मा मॅडम,प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री गौतमा आर कडे प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रियांका रणपिसे,प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते श्री गोपाल तिवारी,यांच्यासह विविध मान्यवरांनी या उपक्रमाप्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमा अगोदर श्री पवार व श्री ठुबे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांचा महात्मा फुले पगडी,पुष्पगुच्छ शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, देऊन सत्कार करण्यात आला सदर उपक्रमामध्ये ताडीवाला रोड विभागातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील एमपीएससी, यूपीएससीचा, अभ्यास करणारे अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला असून सदर विद्यार्थी सलग बारा तास अभ्यास करणार आहेत यावेळी महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय विभागाचे श्रीकांत संगेपाग निरीक्षक हे सुद्धा उपक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन ग्रंथालयाचे सचिव श्री सुजित यादव यांनी केले आभार ग्रंथालयाचे अध्यक्ष संतोष हुंगार्गी यांनी मानले सदर कार्यक्रम व यशस्वी करण्यासाठी ग्रंथालयाचे श्री गौतम भोसले ईश्वर गायकवाड रणवीर कांबळे संदीप कांबळे महेश वाघमारे अभिषेक यादव दीपक मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अतोनात परिश्रम घेतले सहभागी झाले आहेत.
Home ताज्या बातम्या सलग बारा तास अभ्यास करून महामानवास अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचा उपक्रम.