ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या वक्तव्याबद्दल त्याच्यावर निशाणा साधून टीका केली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी मुलींच्या कपड्यांवरून त्यांची तुलना शुर्पणखाशी केली होती.त्यांनी मुलींची तुलना शुर्पणखाशी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. ‘आमचे कपडे घाणेरडे नाहीत तर तुमचे विचार घणेरडे आहेत’ असे त्या म्हणाल्या. विजयवर्गीय यांना मी अनेकदा कपड्यांवरून भाष्य करताना देखील ऐकले आहे. याच
महिन्यात मी त्यांचा व्हिडीओ पाहिला त्यात त्यांनी असे म्हटले की ‘आजही जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा मला सुशिक्षित तरुण नशेत फिरताना दिसतात. आजकालची
ही पिढी वाया जाताना दिसते. त्यांना चार -पाच कानाखाली द्याव्यात असे मला वाटते. हनुमान जयंतीला मी कधीच छोटे बोलणार नाही.’ असे त्यांनी म्हटले होते.