दी.६/४/२०२३ हनुमान जयंती मुहुर्तावर कोथरूड चे ग्राम दैवत श्री म्हातोबा देवाचा उत्सव व हनुमान जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरते देवस्थानाच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा अखंड हरिनाम सप्ताह. दरवर्षीप्रमाणे यंदा ही कीर्तन महोत्सव चा ज्ञान व भक्तीसागराचा कोथरुड मधील नागरिकांनी आनंद घेतला.संपूर्ण ९ दिवस साजरा होणाऱ्या उत्सवात संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत किर्तन सेवा आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन समस्त ग्रामस्थांकडून करण्यात आले.आळंदी येथून आलेले वारकरी यात सहभागी झाले.९ दिवस कीर्तन सेवा ८ व्या दिवशी काल्याचे कीर्तन सप्ताहाची सांगता करण्यात आली.९ व्या दिवशी हनुमान जन्मोत्सव व श्री म्हातोबा देवाची यात्रा असे नियोजन असते.यंदा कोथरूडचे ग्रामस्थ आणि मुळ रहिवाशी युवकांनी कोथरूड युवा मंचची स्थापना केली, या माध्यमातून गावातील युवकांचे एकीकरण करण्यात आले आणि आपले सण – उत्सव जल्लोषात साजरा करायचे एवढाच उद्देश घेऊन युवा पिढी एकत्र आली.

अधिक वाचा  बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, औद्योगिक विकासालाही चालना मिळण्यास मदत; पालकमंत्री अजित पवारांचा तरुणांसाठी मोठा निर्णय

आजकालच्या फास्ट फॉरवर्ड लाईफ स्टाईल ला छेद देऊन एक भक्ती आणि आनंद उत्सव डी.जे. ला डावलून, विरोध करून पारंपरिक ढोल ताशा झांज पथक आमंत्रित केले गेले. युवापिढी ने व्यसनमुक्ती विषयी जनजागृती केली. येणाऱ्या काळात उत्सवाचे स्वरूप आणखी भव्य आणि जनहित, समाजसेवा, समाजप्रबोधन, एक वेगळाच आदर्श निर्माण करण्याची ईच्छा समस्त ग्रामस्थांनी श्री म्हातोबा चरणी प्रार्थना केली.मानाची काठी, मुळीक परिवाराचा पोषाखाचा मान, म्हातोबा टेकडीवर होणारा जन्मोत्सव, एरंडवणा भागातून

आपले नम्र:-
समस्त ग्रामस्थ कोथरूड