स्व. मनीषा सुनील तांबे यांचे स्मरणार्थ कर्वेनगर हींगणे होम कॉलनी भागामध्ये भव्य रक्तदान शिबिरात 245 रक्तदात्यानी रक्तदान केले, त्यात तरुण व तरुणीं व महिलांचाही खूप मोठा सहभाग होता, त्याच प्रमाणे युवा कार्यकर्ते स्वप्निल सुनील तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात १५० तरुणांनी व तरुणांनी सहभाग घेतलेल्या 58 युवकांना व युवतींना जाग्यावरच नोकरीचे पत्र देण्यात आले, या शिबिराचे आयोजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद उर्फ बंडूशेठ तांबे त्याचप्रमाणे किंग ऑफ किंग्स दहीहंडी उत्सव समिती यांच्यावतीने करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशांतदादा जगताप अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रदीपदादा देशमुख, किशोर कांबळे, मृणालिनी वाणी, बाळासाहेब बराटे, माणिकशेठ दुधाने, कांताअप्पा बराटे, संभाजी बराटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.