भारतीय जनता पक्षाचे बावधन भागातील युवा नेतृत्व पश्चिम महाराष्ट्र क्रीडा आघाडीचे अध्यक्ष धनंजय दगडेपाटील यांच्या बावधन येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री, उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा हस्ते आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली व मा.महापौर मुरलीधरअण्णा मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका वर्षाताई तापकीर, माजी नगरसेवक किरण दगडेपाटील, माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, माजी नगरसेविका डॉ.श्रद्धताई प्रभुणे, श्री.गणेश वरपे, पोलीस पाटील बबनराव दगडेपाटील, अरूणजी राजवाडे, सचिनजी मोरे, किरण बारटक्के, बाळासाहेब नवले, सचिन बदक, गोरख दगडे, मयुर कांबळे, स्विकृत नगरसेवक वैभव मुरकुटे, बाळासाहेब टेमकर, गंगाधर भडावळे, राजेंद्र बांदल, कांचनताई कुंबरे, हर्षदाताई फरांदे, इ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
पश्चिम महाराष्ट्र क्रीडा आघाडीचे अध्यक्ष श्री धनंजय दगडे पाटील यांच्या बावधन येथील कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्यावर लिहिलेल्या वैभव मुरकुटे, अभिजीत धावडे, धनंजय दगडेपाटील, रूपेश घूले यांच्या संकल्पनेतून आणि निर्मितीतून व दिग्विजय जोशी यांच्या आवाजात ध्वनीचित्रफीत रचलेल्या गाण्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ.मनीषा जाधव व सौ.सोनिया महाजन व सर्व प्रभाग १० पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून जनसंघ स्थापनेपासून आज पर्यंतची भाजपची वाटचाल आणि त्या वाटचालीमध्ये मोलाचा वाटा उचललेले महान लोकनायक भाजप इतिहास व रांगोळीरूपात प्रदर्शन बावधन येथे एल एम डी चौकात आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रभाग अध्यक्ष सागर कडू, कैलास मोहोळ, सुप्रिया माझीरे, कैलास माझिरे, राजेश मनगिरे, सागर कडू, राजाभाऊ जोरी, सुरेंद्र कंधारे, जिगिशा भरुचा, गणेश कोकाटे, अमर कोकाटे, अमित तोडकर, सुमनताई मुरकुटे, आरती मुरकुटे, सौ.दिप्तीताई धनंजय दगडेपाटील, मीनल भरते, पल्लाविताई गाडगीळ, कृष्णा भंडारी, बाजीराव पारगे, सचिन हांडे, अक्षय ढाकणे, पवन कोकाटे, निलेश कोकाटे, निखील करंजावणे, प्रतिक वाईकर, रूपेश भोसले, सनि लांडे, आशिष लोखंडे व इतर सर्व पदाधिकारी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.