मुंबई : आयफोन वापरणे आजही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे त्याची असलेली किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागत होती, परंतु आता भारतीयांना एक मोठी भेट मिळणार आहे आणि आता आयफोन खरेदी करणे स्वस्त होणार आहे.

आता आयफोनचे उत्पादन भारतातील प्रतिष्ठित कंपनी
टाटा यांच्याकडे त्याची कमान येणार आहे, टाटा लवकरच भारतात आयफोन तयार करण्यासाठी नवीन उत्पादन प्लांट खरेदी करणार आहे. हा प्रोडक्शन प्लांट मिळाल्यानंतर आयफोनची निर्मिती भारतातच केली जाईल आणि त्यामुळे त्यांचे आयात शुल्क कमी होईल आणि भारतीय ग्राहकांना ते खरेदी करण्यासाठी सध्या पेक्षा कमी रक्कम मोजावी लागणार आहे. टाटा समूह एप्रिलच्या अखेरीस विस्ट्रॉनचा आयफोन प्लांट ताब्यात घेणार आहे. त्यानंतर टाटा कंपनी आयफोनचे
उत्पादन सुरू करेल.

अधिक वाचा  काँग्रेस गटबाजी पुन्हा दिल्लीच्या दरबारी?; खासदार इमरान प्रतापगडी यांच्या ‘संविधान बचाव जनसभेला’ हे नेते अनुपस्थित

विस्ट्रॉनमधून होऊ शकते कर्मचारी कपात
अहवालानुसार, टाटा समूहाने प्लांटमध्ये आधीच संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. संपादन प्रक्रियेचा एक भाग म्हणून कारखाना सुमारे दोन हजार
कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे. सुमारे चारशे मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांनाही कमी केले जाऊ शकते.

असे म्हटले जात आहे की टाटा समूह या करारानंतर आयफोन 15 बनवण्यास सुरुवात करेल. विस्ट्रॉनचा भारतीय प्लांट सध्या iPhone 12 आणि iPhone 14 चे उत्पादन करत आहे.टाटाने बेंगळुरू प्लांट ताब्यात घेतल्यानंतर, विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडेल कारण भारतात ऍपल उत्पादनांचे उत्पादन करणारा हा एकमेव प्लांट होता. ऍपल उत्पादनांसाठी भारताची बाजारपेठ अंदाजे 600 दशलक्ष डाॅलर्स इतकी आहे. या व्यव्हाराकडे एक महत्त्वपूर्ण विकास म्हणून पाहिले जात आहे, विशेषत: अशा वेळी जेव्हा Apple चीनमधून उत्पादनासाठी भारताकडे पाहात आहे.

अधिक वाचा  महसूल खात्यातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्राकडून मिळाला IAS दर्जा; लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती

आयफोन 15 च्या निर्मितीपासून करणार श्रीगणेश
टाटा कंपनी भारतात आयफोन 15 चे उत्पादन सुरू करणार आहे. एका अंदाजानुसार आयफोन 15 ची किंमत लक्षणीयरीत्या कमी केली जाऊ शकते. टाटा कंपनीने नेहमीच गुणवत्तेची विशेष काळजी घेतली आहे, अशा परिस्थितीत भारतीय ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब आहे. प्लांट टेकओव्हर पूर्ण होताच, आयफोन 15 चे उत्पादन भारतात सुरू होईल आणि लॉन्च झाल्यानंतर, भारतीय ग्राहकांना खरेदी करता येईल.