कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली 189 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मंगळवारी रात्री उशीरा यादी जाहीर केली. यादी जाहीर करण्याअगोदर दिल्लीत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या घरी एक बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, अरुण सिंह, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया, बीएल संतोष उपस्थित होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारांची यादी जाहीर करत आहे.

यंदा कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 52 नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये 32 उमेदवार ओबीसी, 30 एससी आणि 16 एसटी प्रवर्गातील आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह म्हणााले की, 9 उमेदवार डॉक्टर, 31 उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट, 5 वकिल, 1 आयईएस, 1 आयपीएस, तीन सेवानिवृत्त अधिकारी आणि आठ महिलांना तिकिट देण्यात आले आहे,

अधिक वाचा  वक्फ सुधारणा कायद्या या तरतुदींना ‘स्थगिती’चा सर्वाेच्च विचार; ७२ याचिकांवर सुनावणी गुरुवारीही पुन्हा सुनावणी होणार

अरुण सिंह म्हणाले, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिगगाव येथून लढणार आहे. या अगोदर देखील त्यांनी निवडणूक लढवली होती. कागवाड येथून बाळासाहेब पाटील निवडणूक लढवणार आहे. गोविंद कारजोल मुदूल येथून, बेल्लारी येथून श्रीरामुलु, मुर्गेश निरानी बिलगी येथून लढणार आहे. सीटि रवि यांन चिकमंगलुरू येथून तिकिट देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे चिरंजीव बीवाई विजयेंद्र शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

ईश्वरप्पा यांनी राजकीय संन्यास घेतला

भाजपचे वरिष्ठ नेते इश्वरप्पा यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. ईश्वरप्पा यांनी पक्षाच्या बैठकीत मंगळवारी राजकीय संन्यास घेण्यासंदर्भात सांगितले. तसेच 10 मे ला होणाऱ्या निवडणुकीसाठी मला उमेदवारी देऊ नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा  ‘शेवटी मदांध तख्त फोडते मराठी’; शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मनसेची बॅनरबाजी, राज ठाकरेंचा स्पष्ट इशारा

डीके शिवकुमार आणि अशोक कनकपुरा आमनेसामने

आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर चिक्काबल्लापूर येथून निवडणूक लढवणार आहे. कर्नााटकाचे मंत्री आर अशोक पद्मनाभनगर आणि कनकपुरा येथून निवडणूक लढवणार आहे. अशोक कनकपुरा आणि कॉंग्रेसचे डीके शिवकुमार आमने सामने येणार आहे. धर्मेंद्र प्रदान म्हणाले, 34 उमेदवारांची यादी एक – दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार
महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहे. भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर राज ठाकरेंची भूमिका काय? ट्रेलर पाहून म्हणाले..