राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्याने मोठा धक्का बसला असे मानले जात असले तरी राजकीय विश्लेषकांनी मात्र या निर्णयामुळे राष्ट्रवादीचा तोटा होण्याऐवजी अधिक फायदाच होईल. राष्ट्रवादीचा दर्जा काढून घेतला तरी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या प्रतिमेला धक्का बसणार नाही. उलट देशभरातील इतर प्रादेशिक पक्ष पवार यांचे नेतृत्व जास्त खळखळ न करता मान्य करतील.आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधकांची भाजप विरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असले तरी निवडणूक आयोगाच्या निकषांचे पालन होत नसल्याने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढून घेण्यात आला आहे. देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्या एवढे अनुभवी नेते नाहीत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्याने त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होईल.

अधिक वाचा  राष्ट्रीय जलमार्गामुळे कमाईच कमाई; मालवाहतूक 146 दशलक्ष टनांवर, असा झाला फायदा

पण पवार यांचे महत्त्व कमी होणार नाही. राष्ट्रीय पातळीवर पवार यांचे महत्त्व हे पक्षाच्या मताच्या टक्केवारी नाही तर त्यांच्या त्यांच्या अनुभवामुळे आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्याने देशातील इतर प्रादेशिक पक्ष जास्त खळखळ न करता पवार यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या सोबत येऊ शकतात. या निर्णयाचा हा उलट पवार यांना फायदाच होण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्राचा स्वाभीमान प्रज्वलित करणारा प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्ते अधिक तीव्र भावनेने काम करतील असे या निर्णयामुळे दिसून येत आहे.

‘‘शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या विरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत. त्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने ना निर्णय घेतला आहे. पण आम्ही यामुळे खचून जाणार नाही, उलट आगामी निवडणुकीत आम्ही ताकद दाखवून देऊ.’’

अधिक वाचा  कोथरूड 17 एप्रिलची एकच चाहूल; नातं रक्ताचं अविरत मैत्रीचं अनोख पाऊल! ३२व्या ‘रक्तदान यागा’चं उद्घाटकही मैत्रीचंच; राम बोरकरांचा गौरवास्पद उपक्रम 

– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस