प्रत्येक कार चालकाला त्याच्या कारनेही चांगल मायलेड द्यावं अशी अपेक्षा असते. महामार्गांवरून प्रवास करत असताना आपल्या कारनेही इतरांना मागे टाकावं आणि कमी इंधनात मोठा पल्ला गाठावा असं प्रत्येकाला वाटतं असतं. मात्र बऱ्याचदा आपल्या काही लहान मोठ्या चुकांना मुळे किंवा दूर्लक्ष झाल्याने कारचं मायलेज कालांतराने कमी होवू लागतं.अर्थातच मायलेज कमी झाल्याने इंधनाचा खर्च वाढतो आणि खिशाला मोठा फटका बसतो. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत बऱ्याचदा CNG Car ही कमी खर्चिक असते. मात्र या कारमध्ये कालांतराने मायलेज कमी होण्याची शक्यता निर्माण होते. असं असलं तरी तुम्ही काही गोष्टींची दखल घेतलीत तर तुमची सीएनजी कारही CNG Car चांगलं मायलेज देऊ शकते.कारच्या क्लचची काळजी घ्यावी- अनेकदा कारच्या अधिक इंधन खेचण्यामागे कारच्या गियरबॉक्समध्ये असलेल क्लच ही कारणीभूत असू शकतं. कल्च जर योग्य परिस्थितीत नसेल तर याचा थेट परिणाम गाडीच्या मायलेजवरही पडू शकतो. यासाठीच वेळोवेळी कारच्या क्लचची तपासणी करून काळजी घेणं गरजेचं आहे.

अधिक वाचा  राष्ट्रीय जलमार्गामुळे कमाईच कमाई; मालवाहतूक 146 दशलक्ष टनांवर, असा झाला फायदा

टायरच्या प्रेशरची काळजी घेणं गरजेच- कारच्या मायलेजसाठी टायरचं प्रेशर योग्य प्रमाणात असणं जास्त गरजेचं आहे. टायरमध्ये कमी प्रेशर असताना कार चालवल्यास अनेकदा रस्ता आणि टायरचं रबर यामध्ये जास्त घर्षण निर्माण होतं. याचा थेट प्रभाव कारच्या इंजनवर पडतो. इंजिनवर जास्त दबाव म्हणजेच जास्त इंधनाचा वापर. यासाठीच कारच्या टायरचं प्रेशर नेहमी तपासणं गरजेचं आहे.एअर फिल्टर स्वच्छ ठेवणं गरजेचं- कारच्या एअर फिल्टरची काळजी घेणंही गरजेचं आहे. सीएनजी हा हवेपेक्षाही हलका असतो त्यामुळे काही वेळा हवेतील कण पॉवरट्रेनमध्ये समस्या निर्माण करू शकतात. हवा सहसपणे पार न होवू शकल्याने इंजिनवर दबाव निर्माण होण्यास सुरूवात होते. त्यामुळे चांगलं मायलेज मिळण्यासाठी एअर फिल्टर वेळोवेळी साफ करणं गरजेचं आहे. ५ हजार किलोमीटर पर्यंतची राईड झाल्यानंतर एअर फिल्टर बदलणं गरजेचं आहे.

अधिक वाचा  अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस पुण्यात सोसायटीत राडा; महिलांना केस ओढत मारहाण व्हिडिओ आता समोर

स्पार्क प्लग बदलावं- CNG कारचं इग्निशन तापमान हे पेट्रोल कारपेक्षा अधिक असतं. म्हणूनच CNG कारमध्ये शक्तीशाली स्पार्क प्लग वापरणं गरजेचं आहे. याशिवाय एकसारख्याच कोडचा स्पार्क प्लगचा सेट असावा याची खात्री करून घ्यावी. तसचं कारची हीट रेंजही कंपनीच्या नियमानुसारच असावी.गॅस लिकेज चेक करावी- जर तुमच्या CNG गॅसच्या टाकीत लिकेज असेल तर मायलेज कमी होण्याची दाट शक्यता असते. तसचं सुरक्षेच्या दृष्टीने देखील ते धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे सीएनजी कीटची वेळोवेळी तपासणी करा. खास करून तुम्ही अनेक दिवस एका जागी कार पार्क ठेवली नसेल आणि ती वापरली नसेल तर केव्हाही कारच्या गॅस टाकीची पूर्ण तपासणी करावी. यासाठी कारमध्ये गॅस डिटेक्टर इंस्टॉल करणं कधीही फायदेशीर ठरू शकतं.

अधिक वाचा  ‘मुंडे साहेबांचे नाव लहान होऊ देणार नाही जरी नाव मोठे करण्याची…’ पंकजा मुंडे भगवान गडावर काय म्हणाल्या?