क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त हडपसर गांधी चौक येथे सत्यशोधक गयानबा ससाने यांची नातू ज्येष्ठ मारुती ससाने यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी राजेंद्र ढवळे महेश टेळे सतीश भिसे अनिल व्हावळ योगेश ससाने यांनी मनोगत व्यक्त केले.11 एप्रिल महात्मा फुले शासकीय सुट्टी जाहीर करावी असा ठराव बनकर प्रतिष्ठानच्या वतीने मांडण्यात आला तसे मागणीचे पत्र नायब तहसीलदार अजय बेंगाने साहेब यांना देण्यात आले. बनकर प्रतिष्ठान शासकीय सुट्टी मागणीचे हे पत्र माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री पुण्याचे पालकमंत्री यांना ईमेल करून तशी मागणी करण्यात आली.कार्यक्रमास मोहन चिंचकर भागुजी शिखरे आप्पा धायगुडे मीना थोरात, दिपाली कवडे दिपाली माटे नलिनी मोरे, रूपाली वाडकर, मच्छिंद्र वाडकर पोपट वाडकर विक्रम आल्हाट सचिन आल्हाट विलास शेलार गणेश वाडकर, गणेश ताम्हणे विशाल तोडकर विशाल बोरावके जयप्रकाश जाधव विठ्ठल जाधव बाबा गोंधळे बाबा बनकर नंदू ननावरे, बाळासाहेब ससाणे अविनाश काळे, वामन धाडवे डॉक्टर किशोर सहाणे, विवेक तुपे, चंद्रकांत टिळेकर संतोष ससाने निलेश ससाने, दिलीप भुजबळ सुधीर होले विनोद टाटीया राजेंद्र डांगमाळी, दिलीप कुंभार ,अनिल हिंगणे प्रचंड संख्येने हडपसर ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा  कुणाल कामराला मोठा दिलासा; बजावलेल्या नोटीसीतील मोठी चूक पथ्यावर शिंदे प्रकरणी अटकेपासून संरक्षण हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश वाडकर तसेच उपस्थितांचे आभार बनकर प्रतिष्ठानचे महेंद्र बनकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन स्व. अर्जुनराव बनकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले