मुंबई : जया बच्चन यांनी नुकताच त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला आहे. जया यांनी आत्तापर्यंत सिनेसृष्टीला एका पेक्षा एक सिनेमा दिले आहेत. आज जया यांचं मनोरंजन क्षेत्रात खूप मोठं आहे.आत्तापर्यंत जया यांनी खूप मोठ मोठ्या दिग्दर्शकांच्या सिनेमात काम केलं आहे. तर अनेकदा त्या त्याच्या स्पष्टवक्तामुळे चर्चेत असतात. त्या त्यांच्या बिंधास्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत देखील असतात.पण तुम्हाला माहितीये का? की, हा गुण त्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच होता.

रेप सीनवरुन जया दिग्दर्शकासोबत भिडल्या
उत्तम अभिनय साकारुन प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी गारुड घातलं होतं. त्यांच्या काळात त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.पण अंग प्रदर्शन त्यांना कधीच पटलं नाही. आणि त्यांनी ते कधीच योग्य मानलं नाही. मात्र एकदा एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्यांच्याकडे रेपसीनवेळी कपडे फाडण्याची मागणी केली होती आणि तेव्हा त्यांनी यासाठी साफ नकार दिला होता. यासंबधित बोलताना जया बच्चन म्हणाल्या होत्या की, या सिनेमात हिरोच्या पात्राने हिरोईनच्या पात्रावर रेप केला आहे.सिनेमाची कहाणी सांगताना मला सांगण्यात आलं होतं. यावरं बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, मला सांगण्यात आलं होतं की, तुमचे कपडे फाडले जातील. मी त्यावेळी सरळ त्यांना सांगितलं की, नाही मी असं अजिबात करणार नाही. यानंतर माझ्यात आणि बाबूदा यांच्या खूप मोठं भांडण झालं. त्यांनी मला धमकी दिली होती की, ते सिनेमाच बंद करतील. आणि मी त्यांना यावर म्हणाले की, जर माझ्यासोबत या सिनेमात सगळं जबरदस्तीने सगळं केलं गेलं की, तर तुम्ही बघाच. मी यात एवढं खराब काम करेन की, तुमचा सिनेमा डुबेल.” त्यांच हे भांडण खूप टोकाला गेलं. आणि त्या दिवशीचं त्यांचं शूट कॅन्सल झालं. आणि त्यापुढचे दोन दिवस या सिनेमावर कोणतंच काम झालं नव्हतं.

अधिक वाचा  मर्जीतील ठेकेदारासाठी महाराष्ट्रात काम केल्याची सक्ती; राज्यातील एक ते दोन कंपन्या या निविदेसाठी पात्र ठरणार

यानंतर या प्रकरणात बीग बींनी उडी घेतली. याविषयी बोलताना जया म्हणाल्या, ” अमितजींनी मला म्हणाले की, तू इथे काम करायला आला आहेस. जर ही तुमची भूमिका असेल तर ती तशाच प्रकारे लिहिलेली असेल, तर तुम्हाला ती करावीच लागेल. तुम्ही ते कसं काय नाकारू शकता? यावंर मी म्हणाले, ‘मी माझे कपडे त्यांना फाडू देणार नाही. मी मला पडद्यावर फाटलेले कपडे दाखवू देणार नाही.”यानंतर जया आणि दिग्दर्शक यांच्यात करार झाला. या करारावर जया बच्चन म्हणाल्या की, दिग्दर्शकाने कबूल केलं की, आम्ही नॅच्यूलर पद्धतीने सगळं करु. तुम्ही तुमची एक्टिंग करा पुढंच आम्ही बघू. मात्र बिचारा सिनेमातला विलन. जो माझ्यासोबत रेप सीन करणार होता. सीन दरम्यान मी त्याला इतकं मारलं की, ”मला तिच्यासोबत रेप सीन शूटचं करायचा नाही.” जया बच्चन यांनी अनेकदा सांगितलं आहे की, त्याना शरिर प्रदर्शनाच्या विरोधात आहे.

अधिक वाचा  मोदी सरकारला झटका.. वक्फ कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सरकारला 7 दिवस वेळ तोपर्यंत नव्या कायद्याला स्थगिती