बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या काही महिन्यांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी सलमानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकीचा मेल पाठविण्यात आला होता.धमकीच्या या
मेलमुळे खळबळ माजली होती.त्यानंतर लगेच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

आता पुन्हा
एकदा सलमानला धमकीचा फोन आला आहे.काल १० एप्रिलला सलमानने त्याच्या ‘किसी का भाई किसी की
जान’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला.या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला खुद्द सलमान हजर होता.ट्रेलर लॉन्चच्या
रात्रीच मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये सलमानला जीवे मारण्याचा धमकीचा कॉल आला.मी जोधपूरचा
गोरक्षक रॉकी भाई बोलत असल्याचं कॉलरने सांगितलं.

अधिक वाचा  मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी ‘बौद्ध भन्तेंकडून बुद्ध वंदना आणि धम्मदेसना’ अभिवादनासाठी उसळला जनसागर

खरेदी केली बुलेटप्रूफ कार
सतत येणाऱ्या धमक्यांनंतर सलमान खाननं बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. या महागड्या कारचे फोटो सोशल
मीडियावर व्हायरल झाले आहेत. सलमाननं खरेदी केलेली बुलेटप्रूफ कार भारतीय बाजारपेठेतही लाँच झालेली नाही.सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचा आगामी सिनेमा किसी का भाई किसी की जान ईदच्या मुहुर्तावर २१ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.