दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख असलेल्या आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अध्यक्ष असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोगाने काढून घेतला आहे. हा आदेश निवडणूक आयोगाने सोमवारी जारी केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस व तृणमूल काँग्रेसला अनुक्रमे नागालँड व मेघालय या राज्यांत राज्य पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. या दोन राज्यांत काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षांनी केलेल्या कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. लोक जनशक्ती पार्टी (राम- विलास) या पक्षाला नागालँडमध्ये, व्हॉईस ऑफ पीपल्स पार्टीला मेघालयात तर टिपरा मोथा या पक्षाला त्रिपुरामध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. 

अधिक वाचा  ‘ब्राह्मणांनो महिलांना सोडा, इतकी सभ्यता…,’ अनुराग कश्यपने शेअर केली पोस्ट, म्हणाला ‘तुमचे संस्कार…’

देशात ६ राष्ट्रीय पक्ष-

भाजप, काँग्रेस, माकप, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, आप या सहा पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.

राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी कोणत्या अटी आहेत?

१. संबंधित पक्षाला चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा असायला हवा.

२. लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत किमान सहा टक्के मतं मिळायला हवी.

३. निवडणुकीतील सहा टक्के मतं चार राज्यांतील असायला हवीत.

४. देशातील कोणत्याही राज्यात चार खासदार असायला हवेत.

५. मिळालेल्या एकूण मतांपैकी दोन टक्के जागांवर पक्षाचा विजय झालेला असावा.

६. विजयी उमेदवार चार वेगवेगळ्या राज्यातील असावेत.

अधिक वाचा  श्री रामेश्वर पॅनलचा बहुमतानेच विजय होणार; भाग भांडवलदार कर्जदार ठेवीदारांच्या विश्वासावर संचालकांचा ठाम विश्वास

राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे :

१. राखीव निवडणूक चिन्ह मिळते

२. पक्षाच्या कार्यालयासाठी अनुदान दरांमध्ये जमीन मिळते.

३. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण होते.

४. निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण होते.