बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या २१ एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय.सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. व्यंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपति बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग असे अनेक बडे बडे स्टार्स या सिनेमात आहेत. साऊथ सुपरस्टार रामचरण या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये आहेत. या सर्व कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतलं माहितेय?सलमान खान या चित्रपटात एका हटके लुकमध्ये दिसणार आहे. लांब केसांमध्ये त्याचा लुक सध्या जाम चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमानने या चित्रपटासाठी कथितरित्या ५० कोटी रूपये मानधन घेतलं आहे.

अधिक वाचा  मराठीचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ, राज यांचे सरकारला १० प्रश्न: राज ठाकरेंचा इशारा