मुंबई : तुरुंगातील भाकरी म्हटलं की, लोकांना हिंदी चित्रपटातील अनेक सीन आठवतात. त्याचबरोबर त्यामध्ये दाखवण्यात आलेली भांडी डोळ्यासमोर येतात. पण तुम्हाला हे ऐकूण धक्का बसेल की, काही लोकं जेलमधील जेवण खाण्यासाठी अधिक खर्च करीत आहेत. बिझनेस मॅन हर्ष गोयंका यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामध्ये लोकं जेवणाची मजा घेत असल्याचं दिसत आहे. तिथं जाऊन प्रत्येकाने जेवणाचा अनुभव घ्यायला हवा. त्या व्हिडीओला लोकांच्या अधिक कमेंट येत आहेत.

काय मिळतंय जेलमध्ये खायला

त्या ट्विटमध्ये हर्ष गोयंका यांनी लिहिलं आहे की, ‘तुरुंगाचा आनंद घ्या, कोणीतरी ते जसे आहे तसे स्वीकारले आहे.’ व्हिडीओ एकजण जेलच्या गेटजवळ उभा आहे. त्याचबरोबर बाहेर सुध्दा अधिक सुरक्षा आहे. जेलचा दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये एक वेगळा नजारा पाहायला मिळत आहे. इथं कैद्यांना कसल्याची प्रकारची सक्ती केली जात नाही. तिथं गेल्यानंतर कैद्यांना चांगल्या पद्धतीचं जेवण दिलं जात. खरंतर ते एक तरुंग हॉटेल आहे. हे हॉटेल बँगलोरमध्ये आहे. तुम्हाला तिथं जाऊन जेवण करायचं असल्यास तुम्ही सुध्दा तिथला अनुभव घेऊ शकता.

अधिक वाचा  श्री रामेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा नांदेड गावात उत्साहात शुभारंभ; विश्वासहार्य पारदर्शी कारभारामुळे पुन्हा ‘विजयी’चा संकल्प

ते खरचं जेल आहे का ?

खरंतर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रश्न केले आहेत. त्याचबरोबर बंद असलेल्या जेल हॉटेलबाबत अनेक मजेशीर कमेंट आल्या आहेत. एक नेटकरी म्हणतोय, ‘हे खरं आहे का’ पुढे त्याने लिहिलं आहे की, ‘खाण्याबद्दल तक्रार केल्याबद्दल त्यांना खरंच शिक्षा होईल ना?’एका यूजरने लिहिले की, ‘तेथे गेल्यानंतर जेलचा गणवेशही मिळायला हवा.’ ही बातमी लिहेपर्यंत या ट्विटरला ६६ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.