मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक अयोध्यात रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले होते. शिंदेंच्या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होत.
मात्र एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात चक्क गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला सिद्धू उर्फ सिद्धेश अभंगे नावाचा गुन्हेगार एकनाथ शिंदे यांच्या विमानातून अयोध्यासाठी गेला होता. त्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.
सत्तसंघर्षाचा निकाल लागल्यानंतर शिंदे गटात गेलेल्या खासदारांचं काय होणार? वाचा तज्ञ काय म्हणतात
त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “काय हा ‘फडतूस’पणा? अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे तेथे धुवायला नेलेला वाटतं. ते ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून. आता हे तुम्हाला चालते का देवेंद्रजी? या ट्विटमुळे चर्चांना उधान आलं आहे.
ठाण्यातील सहाय्यक आयुक्त महेश आहिर यांच्यामुळे आधिवेशनात रान पेटलं होतं, त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धेश अभंगे नावाचा गुन्हेगार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्याला गेल्याने अशा आरोपींना मुख्यमंत्री पोसतात का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोण आहे सिद्धेश अभंगे?
सिद्धेश अभंगे हा अट्टल गुन्हेगार आहे. त्यांच्यावर खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे, अमली पदार्थांची तस्करी अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सिद्धेशविरुद्ध ठाण्यातील कोपरी, चितळसर, वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो यू ट्यूबचा भाई म्हणून कुख्यात आहे. त्याला याआधी तडीपारही करण्यात आले होते. सामाजिक संस्था चालविणारा सिद्धू नेहमी गाड्याच्या ताफ्यात फिरत असतो. ठाणे रेल्वे पार्किंगचे ठेके त्याच्याकडे आहेत.