शिवसेनेच्यावतीने (शिंदे गट) अयोध्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. आज (दि.७ एप्रिल) ठाणे आणि नाशिकमधून एक-एक ट्रेन अयोध्येच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. उद्या हे शिवसैनिक अयोध्येत दाखल होतील. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ९ एप्रिलला अयोध्येत पोहचणार आहेत. अयोध्येच्या दिशेने शिवसैनिकांच्या रेल्वेगाड्या रवाना झाल्या, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: उपस्थित होते. मात्र, शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्यामागची नेमकी कारणं काय आहेत? या दौऱ्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे काय साधणार? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहेत.
शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याचा अर्थ काय?
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. तसेच त्यांच्या बरोबर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि शेकडो शिवसैनिक आहेत. त्यामुळे या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला अर्थ प्राप्त झाला आहे.
अयोध्या दौऱ्याचे टायमिंग शिंदेंनी साधलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. आगामी विधानसभा, लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकींच्या बरोबर आधी ते अयोध्या दौऱ्यावर जात असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बरोबर टायमिंग साधलं, अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हिंदुत्वाचं दौऱ्यामागे राजकारण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. मात्र, त्यांच्या अयोध्या दौऱ्यामागे हिंदुत्वाचं राजकारण असल्याचं बोललं जात आहे. तसेच शिवसेना पक्ष आणि नाव दोन्हीही शिंदेंना मिळाल्यानंतर आता हिंदुत्वही आपल्याकडेच आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न या दौऱ्यामागे असून आगामी निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचं राजकारण या दौऱ्यामागे असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
चेहरा राष्ट्रीय स्तरावर प्रस्तूत करणं?
एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि नाव दोन्हीही आहे. त्यामुळे एवढा मोठा पक्ष असल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन राष्ट्रीय स्तरावर स्वतःला प्रस्तूत करण्याचाही हा प्रयत्न आहे का? असा सवालही काही जणांकडून करण्यात येत आहे.
हिंदुत्व घेण्याचा प्रयत्न?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. तसेच त्यांचे अयोध्यामध्ये जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाकरेंकडून शिवसेना शिंदेंना मिळाल्यानंतर आता हिंदुत्वही काढून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.