गारपीट झाल्याने कांदा पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. काही भागात शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. गहू, फळबागांचेही यामध्ये मोठ नुकसान झाले आहे. राज्यात कोणकोणत्या ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झाले, याबाबत न्यूज18 लोकमतने घेतलेला आढावा.

बीड जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसला आहे. माजलगाव, धारुर, वडवणी तालुक्यात आज सकाळ पासूनच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यासमोर नवसंकट उभा केला आहे. काढणीला आलेले रब्बी पीक ज्वारी गहू याबरोबर कांदा पिकाना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे.

अधिक वाचा  आता धर्मादाय रुग्णालयात रुग्णांवर होणार मोफत उपचार?; मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

हिंगोली शहरासह परिसरात आज दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात काल सायंकाळपासून ढगाळ वातावरण होते. अशातच हिंगोलीसह सेनगाव तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतातील हळदीच्या कामांना मात्र, अडथळा निर्माण झाला आहे.

येवला तालुक्यातील परिस्थिती काय?

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस होत आहे. येवला तालुक्याच्या पूर्व भागाला विजेच्या कडकडाट करत बेमोसमी पावसाने झोडपून काढले. पावसामुळे कांदा, गहू जनावरासाठी साठवून ठेवलेला चारा भिजून खराब झाला आहे. वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

अधिक वाचा  एक महिला दिन स्वयंपुर्णतेचा! खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते आरी वर्क किट प्रशस्तीपत्र प्रदान सोहळा

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं झालं

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव आणि पारनेर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे मोठ नुकसान झाले आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा, कुकाणा येथे वादळी वारा यामुळे अनेक घरांचे छत उडून गेले. तर अनेक जनावरेही दगावली आहेत.

शेवगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील भातकुडगावसह भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, गुंफा परिसरात काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांदा, गहू, फळबागांचे मोठे नुकसान झाला. याशिवाय नेवासा तालुक्यात सुसाट्याच्या वारा यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतला आहे.

अधिक वाचा  मोठी बातमी महाराष्ट्रात बदलाची हवा! राज ठाकरेंचे उद्धव यांच्यासोबत युतीचे संकेत; म्हणाले, आमचे वाद किरकोळ

गारपीट झाल्याने कांदा पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. काही भागात शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. गहू, फळबागांचेही यामध्ये मोठ नुकसान झाले आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून मागील वर्षीची अतिवृष्टीची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्यातच आता नवीन संकट उभे राहिले आहे.