राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी तेजपूर हवाई अड्ड्यावरून सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानाने उड्डाण केले. यावेळी राष्ट्रपती हवाई दलाच्या गणवेशात दिसून आल्या. राष्ट्रपती या तीनही दलाच्या प्रमुख असतात.

त्रिदलाच्या प्रमुख या नात्याने त्यांना यावेळी ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेजपूर हवाई अड्ड्यावरून सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानाने उड्डाण केले. यावेळी त्यांना सैन्याची शक्ती, शस्त्र आणि धोरणांची देखील माहिती देण्यात आली. याआधी 2009 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी देशातील या अत्याधुनिक लढाऊ विमानाने उड्डाण केले होते. तसेच माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम आणि रामनाथ कोविंद यांनी हवाई दलाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केले आहे.

अधिक वाचा  तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससूनची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’

सुखोई-30 एमकेआयची वैशिष्ट्य

सुखोई Su-30MKI ची लांबी 72 फूट, पंख 48.3 फूट आणि उंची 20.10 फूट आहे. त्याचे वजन 18,400 किलोग्रॅम आहे. शस्त्रांसह हे वज 26,090 किलोग्रॅमपर्यंत जाते, तसेच याची कमला वजन क्षमता 38,800 किलोग्रॅम एवढी प्रचंड आहे. सुखोई ला ल्युल्का L-31FP आफ्टरबर्निंग टर्बोफॅन इंजिनद्वारे समर्थित आहे, जे त्यास 123 किलोन्यूटनची शक्ती देते. ते ताशी 2120 किमी वेगाने उडते. त्याची लढाऊ श्रेणी 3000 किलोमीटर आहे. जर इंधन मध्यभागी सापडले तर ते 8000 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. याचा कमी उंचीवरील वेग 1.2 मॅक अर्थात 1350 किलोमीटर प्रतितास असून अति उंचीवरील वेग 2 मॅक अर्थात 2100 किलोमीटर प्रतितास आहे.

अधिक वाचा  जिवंत शिवसैनिकाला अखेर स्मशानात जाऊन तिरडीवर झोपावं लागलं, कारण….