गिरीश गायकवाड, लखनऊ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवसाच्या
अयोध्या
दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची तयारी दोन राज्यात सुरु झाली आहे.
महाराष्ट्राप्रमाणे उत्तर प्रदेशातही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तयारी सुरु आहे. शिंदे यांचा अयोध्या दौरा
यशस्वी करण्यासाठी उत्तर प्रदेशातील नेत्यांप्रमाणे भाजपचे महाराष्ट्रातील नेतेही मैदानात उतरले
आहे. भाजपने दोन जणांवर ही जबाबदारी सोपवली आहे. भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन
यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. तसेच आशिष शेलार यांनाही जबाबदारी देण्यात आली
आहे. त्यांच्या मदतीसाठी उत्तर प्रदेशातील भाजप नेतेही असणार आहेत. अयोध्येत मोठे शक्ती
प्रदर्शन करुन शिंदेंना बळ देण्याचे काम भाजप करणार आहे.

अधिक वाचा  ‘ज्यांनी लंगोट घातला नाही, ते…’, कुस्ती पंच नितीश काबलिये निलंबन प्रकरणावर पृथ्वीराज मोहोळची प्रतिक्रिया