नवी दिल्ली, 7 एप्रिल : आजकाल कोणी कोणाच्या प्रेमात पडेल काही सांगता येत नाही. ‘प्रेम आंधळं असतं’ या वाक्याप्रमाणे प्रेमाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आपल्या कानांना आणि डोळ्यांना विश्वास बसणार नाही असं विचित्र प्रेमही सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतं. सध्या अशीच एक प्रेमाची विचित्र घटना चर्चेत आली आहे. जी वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.सध्या समोर आलेल्या घटनेत आईनेच स्वतःच्या मुलीचे घर उद्ध्वस्त करून स्वतःचे घर बांधल्याचं समोर आलंय. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल मात्र ही घटना खरी असून आई मुलीच्या नात्यावर काळीमा फासणारी घटना असल्याचं नेटकरी म्हणत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

अधिक वाचा  पाण्यात काठी मारल्याने पाणी तुटत नाही, राज-उद्धव भाऊ भाऊ, कुटुंब म्हणून एकत्र यावं, पण.. : सुषमा अंधारे

लॉरेन वॉल 19 वर्षांची असताना विमानतळावर काम करणाऱ्या पॉल व्हाईटशी विवाहबद्ध झाली होती. 55 वर्षांच्या असलेल्या तिच्या आईने या लग्नात खूप पैसा गुंतवला. लॉरेनला तिच्या स्वप्नातील पुरुषाशी लग्न करण्याची संधी दिली. लग्नानंतर लॉरेनने तिच्या आईला हनीमूनलाही बोलावले होते. सासू, जावई आणि मुलगी हे तिघे डेव्हॉनमध्ये दोन आठवड्यांसाठी हनिमूनला गेले होते. तिथून परतल्या नंतरच पॉल आणि लॉरेनमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. पॉलने लवकरच लॉरेनला घटस्फोट दिला. पॉल लग्नाच्या आठ आठवड्यांनंतर लॉरेनला सोडून गेला.या घटनेनंतर लॉरेन तुटली आणि भावनिकदृष्ट्या तिच्या आईवर अवलंबून राहिली. पण नऊ महिन्यांनंतर तिच्या आईने मुलाला जन्म दिल्याने लॉरेनच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर खरं समोर आलं की पॉलचे त्याच्या आईवर प्रेम होते आणि दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले होते. लॉरेनपासून घटस्फोट घेतल्यानंतर पॉल आणि ज्युली एकत्र राहू लागले आणि आता दोघेही विवाहित आहेत. लॉरेनच्या मते, या विश्वासघातासाठी ती आपल्या आईला कधीही माफ करू शकत नाही. ज्या आईने तिच्यासाठी पॉलशी लढायला हवे होते, तिनेच मुलीचे घर उद्ध्वस्त केले.दरम्यान, यापूर्वीही प्रेमाविषयी अनेक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. आपण विचारही करु शकत नाही अशा घटना वास्तवात घडत असतात.

अधिक वाचा  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महेश मांजरेकरांना जीवनगौरव विशेष पुरस्कार जाहीर