कितीही सभा घेतल्या तरी 2024 मध्ये महाविकास आघाडीचंपानिपत होणार असल्याचं वक्तव्य मंत्री संदीपान भुमरे यांनी केलं. ते बीड जिल्ह्यातील नारायणगड इथे बोलत होते. छत्रपती संभाजी नगरमध्ये 2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेवरही मंत्री संदीपान भुमरे यांनी भाष्य केलं. एकत्र येऊन सभा घेण्यापेक्षा एकट्यानं सभा घेऊन दाखवावी. येत्या काळात महाविकास आघाडीच्या सभेपेक्षा शिवसेनेची सभा किती मोठी होणार आहे हे सर्वांनी पाहावं असंही भुमरे म्हणाले.

शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री संदीपान भुमरे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी नारायणगड येथे जाऊन विठ्ठलाच दर्शन घेतलं आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नारायण गडासाठी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र त्यातील फक्त दोन कोटी रुपये नारायण गडाला मिळाले होते. त्यामुळं उर्वरित निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी संदिपान भुमरे यांनी नारायण गडाच्या महंतांनी दिल आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सोबत कितीही घटक पक्ष गेले तरीही 2024 च्या निवडणुकीत त्यांचं पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. येत्या काळात महाविकास आघाडीच्या सभेपेक्षा शिवसेनेची मोठी होणार असल्याचे भुमरेंनी सांगितले.

अधिक वाचा  मुख्यमंत्री फडणवीसांच्या १०० दिवस आढावा 6 दिग्गज मंत्री फेल; उपमुख्यमंत्री शिंदेंची धक्कादायक कामगिरी

आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल

महाविकास आघाडीकडून काही दिवसांपासून वारंवार सरकार कोसळणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे असणारे आमदार आणि कार्यकर्ते फुटू नयेत म्हणून सरकार कोसळण्याच्या अफवा केल्या जात असल्याचे मंत्री संदीपान भुमरे म्हणाले. मात्र, आमचं सरकार हा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार असून 2024 मध्ये देखील आम्ही सत्तेमध्ये येऊ असा विश्वास संदिपान भुमरे यांनी बोलून दाखवला.