ईडीच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत ईडी कार्यालयातच काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्याच कार्यालयातील दोघांना अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात काम करणाऱ्या दोन ऑफिस बॉयना अटक करण्यात आली.

ईडी चौकशीच्या प्रकरणांशी संबंधित काही गोपनीय कागदपत्र लीक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पुण्यातील व्यावसायिक अमर मुलचंदानी यांना काही गोपनीय कागदपत्र लीक केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. त्यामुळे त्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, ईडीच्या कार्यालयातील दोन कर्मचारी हे अमर मुलचंदानी यांच्या ड्रायव्हरच्या संपर्कात होते. या कर्मचाऱ्यांनी मुलचंदानी यांच्या ड्रायव्हरला कागदपत्र विकल्याच तपासात समोर आलं आहे, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

अधिक वाचा  पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन