राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरूवार 23 मार्चला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र विधिमंडळात चालत आहे. एकत्र येत असताना दोन्ही नेते एकमेकांसोबत हसत खेळत गप्पा-गोष्टी करत होते. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षानंतर फडणवीस आणि ठाकरे पहिल्यांदाच असे एकत्र दिसले, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडूनही या दोन्ही नेत्यांचे फोटो ट्वीट करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र विधिमंडळात येण्याबाबतच्या चर्चांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

अनेक वर्ष ठाकरे आणि फडणवीसांनी सोबत काम केलंय. जर ते पुन्हा एकत्र येणार असतील तर आम्हाला मान्य असल्याचं शिवसेना नेते कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं आहे. देवेंद्रजी जे करतात ते विचारपूर्वक करतात, त्यांची इच्छा असेल तर हे होवू शकतं. ठाकरे आणि फडणवीस यांनी अनेक वर्ष सोबत काम केलंय.

अधिक वाचा  मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी ‘बौद्ध भन्तेंकडून बुद्ध वंदना आणि धम्मदेसना’ अभिवादनासाठी उसळला जनसागर

त्यांच्यात कोणतीही कटूता नाही, राजकारणात कधी काय होईल? सांगता येत नाही, त्यामुळे देवेंद्रजींनी जर निर्णय घेतला तर तो सर्वांना मान्य राहील, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. शिर्डीमध्ये सुरू झालेल्या तीन दिवसांच्या महापशुधन एक्सपोचं कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्तांना लवकरच मदत दिली जाणार असल्याचं आश्वासनही अब्दुल सत्तार यांनी दिलं