लोकप्रिय गायक आतिफ असलम याच्या घरात चिमुकलीचे आगमन झाले आहे. आतिफची पत्नी सारानं आज 23 मार्च रोजी चिमुकलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आतिफनं ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इतकंच काय तर आतिफनं त्याच्या मुलीचा एक फोटो देखील शेअर केला आहे. आतिफनं शेअर केलेली ही भावूक करणारी पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
आतिफ असलमनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आतिफनं कॅप्शन दिलं की अखेर प्रतिक्षा संपली. माझ्या हृदयावर राज्य करणारी नवी राणी आली आहे. बेबी आणि सारा दोघेही सुखरूप आहेत. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. हालिमा आतिफ असलमकडून रमदानच्या शुभेच्छा. लेकीचा फोटो शेअर करत आतिफनं त्याच्या लेकीचं नाव हालिमा आतिफ असलम असल्याच्या खुलासा केला आहे. त्याच्या या फोटोवर कमेंट करत अनेकांनी आतिफला शुभेच्छा दिल्या आहेत.
एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘प्रभू असं म्हणतात की जेव्हा एका मुलाचा जन्म होतो तेव्हा तो एक प्रकाशाचा किरण घेऊन येतो. पण जेव्हा एका मुलीचा जन्म होतो तेव्हा ती दोन प्रकाशाचे किरण घेऊन येते.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘देवाकडून मिळाला सगळ्यात चांगला आशीर्वाद म्हणजे मुलगी.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘अल्लाकडून रमजानच्या आधीच ईट मिळाली, खूप खूप शुभेच्छा,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी आतिफला शुभेच्छा दिल्या आहेत.
आतिफ आणि सारा यांना आधी दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलांची नावं ही अब्दुल अहाद आणि अर्यान असलम असे आहे. आतिफ असलम हा पाकिस्तानी गायक असला तरी देखील त्याचे भारतात अनेक चाहते आहेत. इतकंच काय तर त्यानं बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर गाणी गायली आहेत. तर आतिफ आणि सारानं 2013 मध्ये लाहौरमध्ये विवाह केला होता.
आतिफच्या कामाविषयी बोलायचं झालं तर भारतात आतिफची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. आतिफची वो लम्हे वो बातें, तू जाने ना, दिल दिया गल्लां, पहली नजर में, तेरा होने लगा हूं आणि बाखुदा तुम्ही हो ही गाजलेली गाणी आहेत. त्यानं आजवर अनेक गाणी गायली आहेत. आतिफची गाणी जुनी झाली तरी सुद्धा आजही लोक ती ऐकत असतात. इतकंच काय तर दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यांची यादी मोठी होत आहे. आतिफचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 7 मिलियन फॉलोवर्स आहेत.