सोमवार दि २० मार्च २०२३ रोजी सांय ८ वा संयुक्त भुसारी कॉलनी येथील खुले मैदानमधील ओपन जीम येथे व्यायाम करत असताना वीजेचा शाॅक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. तत्पूर्वी प्रथम उपचारासाठी नजिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले पण उपचार दरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. अमोल शंकर नाकते वय २३ असे मृत तरुणांचे नाव असून परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे.सदर मैदानात रोज सकाळी आणि संध्याकाळी शेकडो नागरिक लहान मुले या ठिकाणी व्यायाम करतात . सदर भागात जमिनीखालून एम.एस.ई.बी.च्या केबल असल्याचे निदर्शनास आले आहे. घटना घडली,तेव्हा पोलीस, अग्निशमन दल यांना त्वरित कळवण्यातही आले होते.सदर ओपन जीम चा ठेकेदार व अभियंता पुणे मनपा संकल्पना व निधी उपलब्ध करुन देणारे माजी नगरसेवक यांनी नागरीक सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता हलगर्जीपणा केला आहे.

अधिक वाचा  कोल्हापूरवाले निर्णय घेणार ‘भाजप पुणे’चा कारभारी कोण होणार! शहराध्यक्षपदी ब्राह्मण, मराठा की ओबीसी माळी चेहरा?

एम ई एस बी केबल जमिनी खाली असताना त्यांची एन.ओ.सी घेणे गरजेचे होते. चालु केबलवरच ओपन जीम साहित्य लावुन नागरिकांच्या जीवाशी खेळ केला गेला आहे. सुरक्षेची काळजी न घेता कानाडोळा करण्यात आला हे स्पष्टपणे दिसून येते. आपण या गंभीर विषयावर स्वतः लक्ष घालून वरिष्ठ अधिकारी यांची समिती स्थापन करुन जबाबदार माजी नगरसेवक, ठेकेदार, विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन कार्यवाही लवकरात लवकर याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच शहरात असणाऱ्या सर्व ओपन जिमची तातडीने पाहणी करून त्या सुरक्षित आहेत की नाही अजुन कुणा निर्दोष पुणेकरांचा जीव नाहक जाण्याआधी सुरक्षा ॲाडिट तातडीने करण्याची प्रशांत कनोजिया यांनी मागणी केली आहे. दोषींवर कारवाई आणि जिमची तपासणी करण्याची कार्यवाही झाली नाही तर स्व.अमोल नाकते ला न्याय मिळण्यासाठी मनसे पुणे शहरच्या वतीने आंदोलन करन्याचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा  टीव्हीच्या आणखी एका सुनेचा संसार मोडणार ? दिव्यांका त्रिपाठीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण