झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’ ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या शोमधील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या शोमधून विनोदवीर भाऊ कदम घराघरात पोहचला आहे. भाऊ कदमने आपल्या कौशल्याच्या जोरावर मराठी सिनेइंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केले आहे. भाऊ कदमची लेक मृण्मयी कदमने अद्याप सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकलं नसलं तरी ती सतत चर्चेत येत असते. आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. भाऊची लेक मृण्मयी कदमही स्वतःचा व्यवसाय करत आहे.
मृण्मयीने के. जी. जोशी आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केले. तिचे स्वत:चे युट्यूब चॅनल आहे आणि त्याचे हजारो सबस्क्राइबर्स आहेत. २०२०मध्ये तिने ‘तारुंध्या’ हा ब्रँड सुरू केला. मृण्मयीचा ‘ट्रेंडी हेअर बो’ चा व्यवसाय आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मृण्मयीने तिच्या या व्यवसायाबाबतच एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
मृण्मयीने हा व्यवसाय वयाच्या १८ व्या वर्षी स्वत:चा खर्च भागवण्यासाठी सुरु केला आहे. संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं.