महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आज दि.21 मार्चला होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोरच ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा प्रशासकांच्या हाती आहे. राज्यातील 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भातील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोरोनानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे आता आज तरी (दि.21मार्च) याबबात सुनावणी होणार का? सुनावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.