स्वयं स्टाइल गॉडमॅन नित्यानंद या व्यक्तीचा 13 वर्षांपूर्वी एका अभिनेत्रीसोबतचा सेक्स व्हिडीओ देशभरात व्हायरल झाला होता. ज्यानंतर एकच खळबळ माजली होती. अगदी त्याचा आश्रमात कंडोम सापडले होते, असा हा नित्यानंद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बलात्कार, अपहरण यांसारख्या गंभीर आरोपानंतर तो फरार झाला आहे. त्याने देश सोडून ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास’ या तथाकथित नवीन देशाची निर्मिती केली आहे. या कैलासच्या माध्यमातून त्याने असंख्य अमेरिकन नागरिकांना फसवलं आहे. अमेरिकच्या 30 शहरांसोबत बनावट कराराचे रहस्य उघड झालं आहे. मुलांचे अपहरण आणि बलात्काराच्या आरोपांनी वेढलेला हा स्वयंभू गॉडमॅनने 2020 मध्ये भारत सोडून फरार झाला. कोण आहे हा नित्यानंद आणि का तो फरार आहे.
‘कैलास’ बनवणारा नित्यानंद कोण?
तो काळ होता मार्च 2010 चा…तेव्हा एका सेक्स व्हिडीओने देशात खळबळ माजली होती. एका तमिळ अभिनेत्री सोबतचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते दोघे अतिशय आक्षेपार्ह अवस्थेत दिसत होते. या व्हिडीओने देशाला हादरुन सोडलं होतं. त्या काळात हा व्हिडीओ दक्षिणातील सर्व टीव्ही चॅनलेवर दाखवण्यात आला होता. भूकंप आल्यासारखी परिस्थिती देशात होती. त्यांचा भक्तांना जबरदस्त धक्का बसला होता. या दोघांनी तो व्हिडीओ आम्ही नसल्याचा दावा केला होता. पण बेंगळुरु फॉरेन्सिक सायन्स लॅबने या व्हिडीओला पुष्टी दिली होती. त्यानंतर भक्तांवर आभाळ कोसळलं होतं. रंजिता असं त्या अभिनेत्रीचं नाव होतं. तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये तिने काम केलं होतं. या घटनेनंतर तिने 2013 मध्ये संन्यासी होण्याची घोषणा केली. हा आक्षेपार्ह व्हिडीओ नित्यानंदचा माजी ड्रायव्हरने काढल्याचं बोलं गेलं होतं.
नित्यानंदवर 2012 मध्ये बलात्कार आणि अपहरणाचे आरोप झाले. त्यानंतर तो फरार झाला, त्यावेळी पोलीस त्याचा शोधा आश्रमात गेली होती. आश्रमातील दृष्य पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीनच सरकली. आश्रमाच्या एका कोपऱ्यातून कंडोम आणि भरपूर गांजा सापडला होता. त्यानंतर आश्रम सील करण्यात आला होता.