ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एक आक्षेपार्ह फोटो ट्वीट केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ट्वीटनंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांवर टीका केली होती.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बार्शीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी ट्वीटरवर एका अत्याचारपीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतला फोटो शेअर केला आहे.
आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, “देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.”