मुंबई: राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता H3N2 संसर्गजन्य व्हायरसने डोक वर काढलं आहे. मागील तीन दिवसांमध्ये राज्यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच संसर्गजन्य H3N2 ची आढावा बैठक घेऊन नवे आदेश दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज H3N2 संसर्गाबाबत बैठक घेतली आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोविड / H3N2 हे दोन्ही संसर्गजन्य असून दोघांचीही लक्षणही सारखी आहेत. त्याचबरोबर या व्हायरसच्या प्रसाराची कारणेही सारखी आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा ही पुन्हा अॅक्टीव्ह करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.