आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारला शह देण्यासाठी काँग्रेस पक्ष विरोधकांची मोट बांधत आहेत. यासाठी विरोधक पार्टीच्या खासदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीकडे तृणमूल काँग्रेसने पाठ फिरवली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांच्या बैठकीकडे संसदेत तृणमूल काँग्रेसचे अंतर ठेवून आहे. संसदेत टीएमसी आपली भूमिका व रणनीती स्वत: मांडणार असल्याचे टीएमसीचे नेता सुदीर बद्योपाध्याय यांनी माध्यमांना सांगितले. सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे, विरोधी पक्षातील खासदारांनी दिल्लीतील सक्तवसुली संचालनालयाच्या मुख्यालयावर काल (बुधवारी) मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या मोर्चामध्ये एकूण १८ विरोधी पक्षांचे खासदार सामील झाले होते. पण या मोर्चोकडे टीएमसीच्या खासदारांनी पाठ फिरवली होती.
दिल्लीमधील ईडी मुख्यालयावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या मोर्चाच्या माध्यमातून जनतेचे लक्ष हिंडेनबर्ग रिपोर्ट, गौतम अदाणी आणि भारतीय आयुर्विमा मंडळ (एलआयसी) प्रकरणाकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तृणमूल काँग्रेसचे खासदार मात्र या मोर्चामध्ये सामील झाले नाहीत. अदानी समूहावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. ही मागणी करणाऱ्या विरोधकांमध्येही तृणमूल काँग्रेसचा समावेश नाही.
मोदी सरकारच्या विरोधात एकत्र आलेल्या १८ पक्षामध्ये काँग्रेस, डीएमके, सीपीएमस जेडीयू, आरजेडी, एनसीपी, एसपी, जेडीयू, ठाकरे गट, एएपी, सीपीआई, जेएमएमस आईयूएमएल, एमडीएमके एनसी, वीसीके, केसीके आदींचा समावेश आहे. सागरदिघी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक हरल्यानंतर टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस-भाजप यांच्याच अप्रत्यक्षरित्या युती असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे स्वतंत्र्य लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला होता. आगामी लोकसभा निवडणूक टीएमसी स्वतंत्र्यपणे लढणार आहे, कुणाशीही युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विरोधकांनी एकत्र येण्याच्या काँग्रेसच्या आशेवर टीएमसीमुळे पाणी फिरले आहे. टीएमसीच्या अप्लितपणाचा झटका काँग्रेसला बसणार असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.