पश्चिम बंगालच्या विधानसभेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्थसंकल्प सादर होत असताना एक व्यक्ती आमदार असल्याची ओळख सांगत विधानसभेत घुसला असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने अवैधपणे विधानसभेत प्रवेश केला.विधानसभेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तोतया आमदाराचे नाव गजानन वर्मा आहे. हा व्यक्ती स्वतःची ओळख हावडा शिवपुर परिसराचा आमदार मनोज तिवारी अशी सांगत होता.

अधिकाऱ्यांनी पीटिआयाला माहिती दिल्यानुसार, हा व्यक्ती विधानसभेच्या लॉबीमध्ये फिरत होता. यावेळी तो इतरांना बजेट सत्र पाहण्यासाठी विधानसभेत कसं जायचं? असा प्रश्न विचारत होता. त्याने आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला. मात्र, स्वतःचे ओळखपत्र दाखवू शकला नाही. त्यानंतर यासंदर्भात चौकशी करण्यात आली. तोतया आमदार गजाना वर्मा यांनी अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यांनी राज्यपाल सीवी आनंद बोसद्वारा पाठवण्यात आले होते. त्यांनीच विधानसभेत प्रवेश करण्याची परवानगी दिली.

अधिक वाचा  महायुतीत धुसफूस; युतीत राहायचं तर राहा, नाहीतर बाहेर पडा, भाजपचा शिंदे सेनेला इशारा

प्रथम चौकशीत मानले जात होते की तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. या घटनेनंतर वर्मा यांना लॉबीत प्रवेश देणाऱ्या सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. क्रिकेटरमधून राजकारणी झालेले मनोज तिवारी हावडामधील शिवपूर भागातील आमदार आहेत. ममता सरकारमध्ये ते क्रीडामंत्रीही आहेत.