मुंबई : सध्या ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. यंदाचा ऑस्कर भारतीयांसाठी खूपच खास आहे. सध्या लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर सोहळा पार पडत आहे. यंदाच्या अकादमी पुरस्कारांमध्ये भारताला प्रथमच तीन नामांकने मिळाली आहेत. यामध्ये एसएस राजामौली यांच्या RRR या सुपरहिट चित्रपटातील नातू-नातू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी नामांकन मिळाले आहे. तसेच ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ ला सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ ला सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटासाठी नामांकने मिळाली आहेत. त्यामुळे कोण पुरस्कार जिंकला याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आता ऑस्कर बद्दल मोठी अपडेट समोर येत आहे.

अधिक वाचा  देशभरातील ३९०० स्टार्टअपमध्ये बारामतीच्या उद्योजकाचा अव्वल स्टार्टअप ठरला; १० लाख रुपयांचे अनुदानही मंजूर

‘द एलिफंट व्हिस्पर्स’ला सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट म्हणजेच बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी आहे. त्यात सोडून दिलेला हत्ती आणि त्याची काळजी घेणारी व्यक्ती यांच्यातील अतूट बंधन दाखवण्यात आले आहे. ‘हॉलआउट’, ‘हाऊ डू यू मेजर अ इयर?’, ‘द मार्था मिशेल इफेक्ट’ आणि ‘स्ट्रेंजर अॅट द गेट’ हे लघुपटही नॉमिनेटेड होते. या सर्वांना मागे टाकत भारतीय लघूपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने पुरस्कार जिंकला आहे. या लघुपटाची गुनीत मोंगा, कार्तिकी गोन्साल्विस, अचिन जैन आणि डग ब्लश यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे. गुनीत मोंगा यांनी ऑस्करच्या पुरस्कार स्वीकारत खास सोशल मीडिया पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला मोठी भेट; स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच हस्ते होणार लोकार्पण

ऑस्कर जिंकल्यानंतर गुनीत मोंगाच्या आनंदाला पारावार उरला नाही. ऑस्कर ट्रॉफी हातात घेऊन तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना गुनीत मोंगा यांनी लिहिले, ‘आज एक ऐतिहासिक दिवस आहे कारण भारतीय निर्मितीने पहिला ऑस्कर जिंकला आहे. दोन महिलांनी हा पराक्रम केला आहे. धन्यवाद मम्मी, पप्पा, धन्यवाद गुरुजी. माझे सह-निर्माते अचिन जैन, सिख्या टीम, नेटफ्लिक्स, आलोक, सराफिना, डब्ल्यूएमई बॅश संजना. माझा प्रिय नवरा सनी. बाळाला तिसऱ्या महिन्याच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. कार्तिकीला धन्यवाद ज्याने ही कथा आणली आणि संपूर्ण विणली गेली. हा पुरस्कार त्या सर्व स्त्रियांसाठी ज्या उज्वल भविष्याची स्वप्ने पाहत आहेत.

अधिक वाचा  रॉबर्ट वाड्रा हाजीर हो! ईडीने पाठवले पुन्हा समन्स, शिकोहपूर येथील जमिनीचे काय आहे प्रकरण?