मुंबई : ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची आज मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील छत्रपती संभाजी मैदानावर शिवगर्जना येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गट शिवसेनेतील ४० बंडखोर आमदारांवर चांगला हल्लाबोल केला. सभेतील भाषणातून बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करप्ट सीएम म्हणत त्यांच्यावर तोफ डागली आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्यावरून सत्ताधारी शिवसेना पक्षावर जोरदार निशाणा साधत मुंबई महानगरपालिकेतील रस्त्याच्या घोटाळ्यावरून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईकरांना लुटण्याचा प्रयत्न केला, आमचे हिंदुत्व, तुमच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे. आमचे हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे, शिंदे-फडणवीस सरकारवर घोटाळ्याचा आरोप करत मुंबईकरांचे पैसे वाया घालत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

अधिक वाचा  आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या अन् अल्लाहू अकबर म्हणायला लागलो… गणबोटेंच्या पत्नीने पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव