कॉमेडी नाईट्स विद कपिल शर्मा शोची लोकप्रियता जगजाहीर आहे. त्याच्या शो मध्ये येण्यासाठी सेलिब्रिटी
एका पायावर तयार असतात. कपिलही सर्वांची खिल्ली उडवत आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवतो.

केवळ बॉलिवूडच नाही तर क्रिकेट, राजकारण, टीव्ही मालिका, आध्यात्मिक गुरु यांनाही कपिलने शो मध्ये बोलवले
आहे. इतकंच काय त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आपल्या शो मध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं.आज तकला
दिलेल्या मुलाखतीत कपिल शर्माने अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. इतरांना प्रश्न विचारणारा कपिल इथे मात्र
प्रश्नांची उत्तरं देत होता. यावेळी कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला. ‘नरेंद्र मोदी शोमध्ये येणार का?’असा प्रश्न कपिलला विचारण्यात आला असता तो म्हणाला, ‘मी जेव्हा नरेंद्र मोदींना भेटलो तेव्हा मी त्यांना शोमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. तेव्हा ते म्हणाले, ‘येऊ कधीतरी. सध्या विरोधक खूप कॉमेडी करत आहेत.

अधिक वाचा  तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससूनची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’