बारामती: येथे सुरु झालेल्या देशी गोवंश सुधारणा प्रकल्पामुळे दुधाच्या क्षेत्रात नव्या युगाची सुरवात झाली आहे, राज्यालाच नव्हे तर देशाला दिशादर्शक असा हा प्रकल्प ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित भारतातील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्प (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट – पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र) सोबतच एम्ब्रियो ट्रान्सफर (IVF) लॅबोरेटरी याचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, आमदार रोहित पवार, चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, रणजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, डॉ. रजनी इंदुलकर, प्रशांतकुमार पाटील व शरद गडाख यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

अधिक वाचा  ‘मुंडे साहेबांचे नाव लहान होऊ देणार नाही जरी नाव मोठे करण्याची…’ पंकजा मुंडे भगवान गडावर काय म्हणाल्या?

गडकरी म्हणाले शेणापासून पेंट तयार करण्यावर आता भर द्यायला हवा, तो ऑईलपेंटपेक्षा दर्जेदार असून स्वस्तही आहे, त्या मुळे आता या प्रकल्पातून पेंट, खत व गॅस तयार करणे गरजेचे आहे. आपल्याकडे मिल्क पावडरचा दर जास्त असल्याने समस्या आहे. माझा मुलगा न्यूझीलंड ऑस्ट्रेलियातून ही पावडर विकत घेऊन निर्यात करतो, भारतीय किंमत परवडत नाही, त्या मुळे आता या बाबतही उत्पादन वाढविल्यानंतर संशोधन करुन दुध व मिल्क पावडरचे काय करायचे याचाही निर्णय घ्यावा लागेल. माझ्या साखर कारखान्यात दहा वर्षात 300 कोटी रुपये गमावले, यंदा आम्ही साखर न करता इथेनॉलचे केले, आम्ही आता शुगर डिर्टंजंट, हँडवॉश, फेसवॉश, हेअरवॉश तयार करतो आणि जगात सात देशात आम्ही निर्यात करतो. साखरेऐवजी डिर्टंजंट केल्याने आम्हाला फायदा होत आहे.

अधिक वाचा  मी राम नव्हे, दशरथाच्या मार्गावर…; 2 लग्न, एका अफेयरवर कमल हासन स्पष्टीकरण देत म्हणाले, ‘मी देवाला मानत नाही’

गडकरी म्हणाले, मी पवारसाहेबांना विनंती केली आहे की वसंतदादा शुगर इन्स्टियूट मध्ये आता साखरेपासून ग्रीन हायड्रोजन निर्मितीसह , एनर्जी क्रॉप्स व बायोएनर्जी फ्रॉम शुगर केन असा एक प्रकल्प सुरु करण्याची गरज आहे. मी माझा ट्रॅक्टर सीएनजीवर चालवितो लाखभर रुपये वार्षिक वाचतात. सोळा लाख कोटी रुपयांची गॅसची आयात करतो, तंत्रज्ञान उपलब्ध आहे, सीएनजी एलएनजी सारखे उत्पादन आता शेतक-यांनी करावे, अन्नदाता सुखी होणे गरजेचे आहे. शेतकरी उर्जादाता झाला तर देशाचे चित्र बदलून जाईल.

शरद पवार म्हणाले, या प्रकल्पामुळे पुढील दोन वर्षात दुधाची अर्थव्यवस्था बदलेल. गीर गाय ब्राझीलमध्ये प्रतिदिन 60 लिटर दूध देते आपल्याकडे तसेच व्हावे असा प्रयत्न आहे. प्रजनन, सुधारीत पोषण, प्रशिक्षण व जागरुकता निर्माण करण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे. दुधाबाबत शिक्षण देणे व शिकविणे याचे हा प्रकल्प व्यासपीठ आहे. केवळ बारामतीपुरते नाही तर राज्यासाठी हा प्रकल्प मार्गदर्शक ठरेल. वाण सुधारणा देखील यातून होईल. रणजित पवार यांनी प्रास्ताविक केले.

अधिक वाचा  हे मी माझ्या स्वत:च्या अनुभवातून सांगतोय, मागच्या पाच वर्षात रुटीन बदललं अन्… अमित शाहांनी सांगितला फिटनेस मंत्रा