‘सहकार’ क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्ह्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे वर्चस्व होते. मात्र, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी प्रथम जिल्हा दूध संघात आणि आता जिल्हा बँकेत धूर्त खेळी करीत एकनाथ खडसे यांच्या वर्चस्वाला हादरा दिला आहे. जिल्हा बँकेत संजय पवार यांचा विजय म्हणजे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी ‘महाविकास’ आघाडीला हा ‘ईशारा’ आहे.

सहकार क्षेत्रात पक्ष नसतो असे म्हणतात, परंतु पक्षाशिवाय सहकार क्षेत्रही चालत नाही असेही जाणकार सांगतात. त्यामुळे नाही म्हटले तरी सहकार क्षेत्रात पक्ष असतोच. राष्ट्रवादी कॉंग्रेस’ने याच सहकाराच्या माध्यमातून आपल्या पक्षाची पाळेमुळे मजबूत केली आहेत. हेच ओळखून भाजपनेही त्याच मार्गाने पाऊल उचलले आहे, त्यामुळे त्यांनी सहकार क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत केले आहे. जळगाव जिल्ह्यातही आता याची चुणूक दिसू लागली आहे. भाजपने शिंदे गटाच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आता त्याच शिंदे गटाच्या मदतीने ‘सहकार’ क्षेत्रातही वर्चस्व निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे. भाजपचे नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिदे गटाचे नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघात विजय मिळवित ‘राष्ट्रवादी’कॉंग्रेस व एकनाथ खडसे यांना हादरा दिला आहे.

अधिक वाचा  रॉबर्ट वाड्रा हाजीर हो! ईडीने पाठवले पुन्हा समन्स, शिकोहपूर येथील जमिनीचे काय आहे प्रकरण?

जिल्हा बँकेत भारतीय जनता पक्षाचा संजय सावकारे यांच्या माध्यमातून एकमेव संचालक आहे. त्यामुळे आमचा जिल्हा बँक अध्यक्षपद व उपाध्यक्षपद निवडणुकीत कोणताही हस्तक्षेप नाही, अशी घोषणा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केली होती. मात्र, निवडणुकीत आपल्या पक्षाच्या संचालकांचे मत राष्ट्रवादी चे बंडखोर उमेदवार संजय पवार यांच्या पारड्यात टाकत आम्ही सत्ता उलथविण्यात सोबत आहोत अशी धूर्त खेळी केली.

तर शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व दाखविण्यासाठी राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराला खुला पाठींबा देत त्यांच्या मागे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप आमदार मंगेश चव्हाण हे भक्कमपणे उभे राहिले. त्यानी पवारांच्या विजयात साथ दिली. त्यामुळे आज तरी जिल्हा बँकेवर शिंदे गट व भाजपचे वर्चस्व आहे हे उघडपणे दिसून आले आहे. कारण उपाध्यक्षपदीही शिवसेना शिदे गटाचे अमोल चिमणराव पाटील हे आहेत.

अधिक वाचा  तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मला खूप आनंद…’ आत्ता कट रचणारा आमच्या ताब्यात