मोरया मित्र मंडळ कर्वेनगर पुणे यांच्या वतीने कोथरूड, कर्वेनगर भागातील सामाजिक संस्था,मंडळे, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, आणि कर्वेनगर ते डेक्कन भागामधील सर्व शाळांमध्ये जाऊन डॉ श्रीनिवास सामंत लिखित वेध महामानवाचा, शिवराय: संस्कार आणि शिक्षण हे शिवचरित्र भेट देण्यात आले.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार मारणे यांनी केले होते. यावेळी ते म्हणाले मोरया मित्र मंडळ सतत सामाजिक उपक्रम राबवत असते , गेल्यावर्षी पासून शिवाजी महाराज जयंती वाचुन साजरी करावी हि संकल्पना आली कारण *शिवाजी म्हनजे*
*शि म्हनजे शिका*
*वा म्हनजे वाचा*
*जी म्हनजे जिंका*
म्हणून शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिवाजी महाराज कळावे म्हणून आम्ही हि पुस्तके त्याच्या पर्यंत पोहचवत आहोत.आम्हाला शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या विचारांची पिढी निर्माण करायची आहे.म्हनुन त्यांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहे.
या शिवचरित्र भारतीय इतिहास संशोधक मंडळ सभासद मंगेश नवघणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके साहेब, साह्यक आयुक्त वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय राजेश गुर्रम साहेब मंडळाचे उपाध्यक्ष रोहिदास जाधव,ऋषी जगताप, देवेंद्र दांडेकर, अनिल आठवले,अथर्व भरम, निलेश भोईने, मुख्याध्यापक विठ्ठल शिंदे उज्वला ढेरे,अनुया सायगावकर, संगीता कोरडे, स्वप्नील बराटे , मंदार कुंभार,उपस्थित होते .
नवघणे म्हनाले शिवचरित्र हे प्रेरणादायी आहे भविष्यात विद्यार्थी शिवचरित्र वाचणं केल्यानंतर जग जिंकल्या शिवाय राहणार नाही असं वाटतं. मोरया मित्र मंडळाचा खूप छान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असेच उपक्रम भविष्यात सर्व मंडळांनी राबविले पाहिजेत असे मंगेश नवघणे म्हनाले.