विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने सत्ताधारी रिओ पार्टीला पाठिंबा दिला. मात्र, रिओ पार्टी आणि भाजपची येथे युती आहे. यावरुन शिंदे गटाच्या शिवसेनेने राष्ट्रवादीला जोरदार टोला लगावला. यावरुन छगन भुजबळ यांनी सभागृहात यावर आक्षेप घेतला. सभागृहाची सत्ताधारी दिशाभूल केली जात आहे आणि चुकीची माहिती दिली गेली आहे, असे सांगितले. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चुकीचे काही असेल तर ते कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी नागालॅंड येथील विषय काढला. तुन्ही दररोज येऊन खोके खोके करता, आज तुमच्याकडे बोट दाखवले. सोईचे राजकारण करु नका, असे सांगत ‘आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचे वाकून’, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी हाणला.
नागालॅंड राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रिओ पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला जोरदार चिमटा काढला. नागालॅंड येथे ही 50 खोके एकदम ओके झाले का? बदलाचे वारे एकदम कसे वाहत आहेत ते बघा. 50 खोके एकदम ओके नागालॅंड ओके आता म्हणा, असे म्हणाले. त्यानंतर छगन भुजबळ यांनी उत्तर देण्यास उभे राहिले. त्यांनी रिओ पार्टी ही स्थानिक आहे. त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे. चुकीची माहिती देऊ नका, असे भुजबळ यांनी विरोध करताना म्हटले.
गुलाबराव यांनी नागालॅंड येथील विषय काढला. तुन्ही दररोज येऊन खोके खोके करता, आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोटे दाखवतो त्यावेळेस आपल्याकडे चार बोटे असतात. बदलाचे वारे हेच का, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारले. सोईचे भूमिका घेतली. आपलं झाकाचे आणि दुसरे पाहायचे वाकून…पवार साहेब बोलतात त्यावेळेस नेहमी उलटे झाले. कसबा हरली तरी भाजपने तीन राज्य जिंकली. तुम्ही अजितदादा बोलता. तुम्ही बोलता जाणीवपूर्वक , नागालँडसोबत आता झाले. तुम्ही 2014 मध्येही केले. एक लक्षात घ्या. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारु नये, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
नागालँड राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा
नागालँड राज्यात एनडीपीपी – भाजप युती आहे. या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँडमध्ये सात आमदार आहेत. या सर्व आमदारांचा एनडीपीपीप्रणित रिओ यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचा आग्रह होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे सरकार रियो यांच्या नेतृत्वात एनडीपीपीचे आहे. त्यामुळे पाठिंबा दिला असल्याची भूमिका राष्ट्रावादीने घेत भाजपपासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे शिवसेनेने भाजप सरकारमध्ये सहभागी झालात, असे म्हटले आहे.