महिला दिनाचं औचित्य साधून काल ८ मार्च रोजी महिला आमदारांनी प्राधान्याने त्यांची भूमिका मांडली. यावेळी व्यक्त होताना काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पतीचं निधनाला १८ वर्षे पूर्ण झाली, पण यानंतर मलासुद्धा मोठा संघर्ष करावा लागला आहे, असे ठाकूर म्हणाल्या, यावेळी त्यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाबाबत त्यांनी सांगितले. ‘घरासाठी मालमत्ता हक्क आपण किती दिवसांपूर्वीच आणले आहेत. याबाबतीत नियम बनवले आहेत. मात्र मालमत्ता पती कागदपत्रांवर, 7/12 वर महिलांची नोंदवली जातात का? तर या बाबतीत माझं उत्तर नाही असंच आहे. मला दुसऱ्यांची उदाहरणं देणार नाही. माझं स्वत:चंच उदाहरण तुम्हाला सांगते, असे ठाकूर म्हणाल्या.

अधिक वाचा  वक्फ सुधारणा कायद्या या तरतुदींना ‘स्थगिती’चा सर्वाेच्च विचार; ७२ याचिकांवर सुनावणी गुरुवारीही पुन्हा सुनावणी होणार

माझे पती गेल्यावर मला आयुष्यात मोठा संघर्ष करावा लागला. मी जराश्या मोठ्या घरातली होती, मोठ्या घराण्यामध्ये माझं लग्न झालं होतं. मी सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या कधीच दुर्बल घटकात नव्हते. पण माझ्यासाऱख्या महिलेला ही संघर्ष करावा लागला. माझ्या मुलांची नावं 7/12 वर यावं, यासाठीही माझ्यासारख्या महिलेला ही संघर्ष करावा लागतो’, अशा भावना ठाकूर यांनी व्यक्त केल्या.

‘माझ्या पतीच्या निधनाला 18 वर्ष झाली. मात्र अजूनही माझ्या पोरांची नावे मालमत्तांच्या कागदावर आली नाहीत. ही आजची महिलांची स्थिती आहे.ही स्थिती आहे, महिला्च्या कायद्याची. मी माजी मंत्री आहे.महिला आणि बालकल्याण मंत्री पदावर राहिलेली एक महिला तुमच्यासमोर बोलतेय. माझ्यासाऱख्याच महिलेला त्रास होत असेल, तर सामान्य महिलांनची काय स्थिती असेल, हा विचार आपण करूही शकत नाही’, अशी व्यथा ठाकूर त्यांनी व्यक्त केली

अधिक वाचा  गुजरात टायटन्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, शुबमन गिल गोलंदाजी घेत दिली गूड न्यूज