पुणे दि. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे वारजे माळवाडी परिसरातील धैर्य , सामर्थ्य आणि कर्तुत्वाचे जोरावर आपले कार्याचा ठसा उमटवून कुटुंब, समाज तसेच राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या १०१ महिलांचा सन्मानपत्र , बुके देऊन सन्मान करण्यात आला.
आदित्य गार्डन सिटी मधील घरेलू कामगार महिला, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस कर्मचारी, वारजे वाहतूक विभागातील महिला पोलीस कर्मचारी, पुणे मनपा उद्यान विभागातील माळी काम करणाऱ्या महिला भगिनी, संपूर्ण वारजे माळवाडी परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या पुणे मनपाच्या महिला स्वच्छता कर्मचारी, पेट्रोल पंपावर जनसेवा करणाऱ्या महिला कर्मचारी तसेच विविध सोसायटीतील ज्येष्ठ महिला भगिनींचा महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी मा . दगडू हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, मा. विशाल पवार, एपीआय वारजे वाहतुक विभाग, सौ. मनीषा सचिन दांगट, अध्यक्ष, आकांक्षा नारी मंच पुणे शहर , सौ. मनीषा ढोले , सरचिटणीस, सहकार आघाडी पुणे शहर, सुभाष आगरवाल, खजिनदार, सहकार आघाडी पुणे शहर, सौ. अरूणा जोशी, सौ. कुसुम पन्हाळे, सौ.विद्या बर्गे, सौ.मंगल मानकर, व्यंकटेश दांगट, अमजद अन्सारी यांच्यासह वरील सर्व विभागातील महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सालाबादप्रमाणे राबविल्या जाणाऱ्या या छोटेखानी कार्यक्रमाचे सर्व महिला भगिनींनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचे आयोजन सचिन दशरथ दांगट , अध्यक्ष भाजपा सहकार आघाडी पुणे शहर यांनी केले होते .