कोथरुड : कोथरूड येथील गुजरात कॉलनी मध्ये व्यसनच्या राक्षसरुपी पुतळ्याचे प्रतिकात्मक दहनाच्या अनोख्या होळीचे आयोजन करण्यात आले होते. माणसाच्या आयुष्यात निराशा निर्माण होऊन, अंगात आळस भरला तर तो व्यसनाधीन होतो आणि त्यानंतर त्याच्या व्यसनामुळे तो दरिद्री होतो. त्यामुळे माणसांनी तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू, ताडी, भांग, चरस, गांजा, ब्राऊन शुगर, मॉर्फीन, हेरॉइन, हशीश, कोकेन, अफू, आदी सर्व व्यसनांचे या होळी मध्ये दहन होऊन आपल्या आयुष्यात त्यामुळे दात, घास, फुफ्फुसे, हृदय, जठर, मूत्रपिंडे, पचनसंस्था यांचे विकार होऊन कॅन्सर आदी भयंकर रोग होतात यासाठी या अनोख्या होळीचे आयोजन करून आपल्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि शांती नांदो असे मत यावेळी संयोजक प्रितम मेहता यांनी व्यक्त केले.
होळी पर्यावरण पूरक होण्यासाठी लहान होळी केल्याचे संयोजक प्रीतम मेहता यांनी सांगितले. त्यामुळे कमीतकमी वृक्षतोड होऊन पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होणार आहे. होळी मध्ये पोळीचा नैवैद्य टाकल्याने तो जळून नष्ट होतो त्याऐवजी तो नैवेद्य गरीब लोकांना दिल्यास त्यांनाही आपल्या आनंदात सामावून घेता येईल म्हणून यावेळी “लहान करू होळी – दान करू पोळी” असा सामाजिक संदेश देण्यात आला.
यावेळी गुजरात कॉलनी परिसरातील अनेक मान्यवर, नागरिक तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी हर्ष मेहता, आयुष मांढरे, श्रावणी मेहता, आर्या खत्री, मोरया सोनकर, नील मेहता, प्रेम तोटे, कृष्णा क्षत्रिय, प्रथमेश पेठे आदी उपस्थित होते. या अनोख्या होळीची संकल्पना-संयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रितम मेहता आणि मित्रपरिवार यांनी केले होते.