त्या विशिष्ट गटासंदर्भात वापरलेला चोर हा शब्द अतिशय योग्य असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. संजय राऊत यांना हक्कभंगाच्या कारवाई संदर्भात नोटीस देण्यात आली आहे, यावर बोलताना संजय राऊत यांनी आपण बोललं ते योग्य असल्याचं सांगितलं. त्याशिवाय नोटीसला उत्तर का दिले नाही? याबाबतही राऊतांनी स्पष्टीकरण दिलं.

ही एक विधिमंडळाची, संसदेची प्रक्रिया असते. मला हक्कभंगाची नोटीस मिळाली त्यावेळी मी मुंबईत नव्हतो, त्यामुळे मी उत्तर देऊ शकलो नाही. आता अधिवेशन सुरू झालेलं आहे. विधिमंडळातल्या सहकाऱ्यांशी मी चर्चा करेन आणि कशाप्रकारे काय प्रोसेस आहे ते पाहून त्या संदर्भात नक्की उत्तर देईन, असे राऊत म्हणाले. हक्कभंग होईल असं मी काहीही वक्तव्य केलेलं नाही, चोर हे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतं मर्यादित होतं, असेही राऊत म्हणाले.

अधिक वाचा  कोल्हापुरात ‘दाभोलकर हत्या आणि मी’, जामीनातील आरोपी विक्रम भावेंच्या पुस्तकात खळबळजनक दावे!

या देशातील परिस्थिती आणि राज्यातील परिस्थिती एकच आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. आम्ही घाबरत नाही या लोकांनी अतिशय बेकायदेशीरपणे नाव आणि चिन्ह काढून घेतलं, तरी शिवसैनिक लढतो आहे. काल सुद्धा लालू यादव यांच्यावर धाडी पडल्या पण गौतम अदानींना नोटीस पण बजावली नाही. धाडी कोणावर टाकताय? विरोधी पक्षावर. जे चुकीचे आहे त्याच्या विरोधात आम्ही उभे राहणार, असे संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर काय म्हणाले?

महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आले, भांग उतरली की त्यांची सत्ता नक्कीच जाईल. आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत, महाराष्ट्राची जनता किती शुद्धीत आहे हे कसब्याच्या निवडणुकीवरून स्पष्ट झालं आहे. जे भांग पिऊन सत्तेवर बसलेले आहेत, त्यांना कळेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे. त्यांची सगळी भांग कसब्यामध्ये उतरली आहे, असे उत्तर संजय राऊत यांनी फडणवीसांना दिले.

अधिक वाचा  ‘एकही दहशतवादी सोडणार नाही,’ पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींनी खडसावलं

काय म्हणाले होते संजय राऊत?

कोल्हापूर दौऱ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा ‘चोर’मंडळ असा उल्लेख केला होता. महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला होता. यानंतर राऊतांविरोधात सत्ताधारी शिवसेना गट आणि भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच, राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणीही करण्यात आली होती.