नवी दिल्ली | दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्लीच्या
राउस एव्हेन्यू न्यायालयाने 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी मनीष सिसोदिया यांच्या 4 मार्च रोजी सीबीआय कोठडीत दोन दिवसांची
वाढ करण्यात आली होती.यानंतर मनीष सिसोदिया यांना आज (6 मार्च)
न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने मनीष सिसोदिया
यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनीष सिसोदिया यांनी
दिल्लीतील मद्य धोरणात बदल करतना आर्थिक लाभ मिळविल्याप्रकरणी
सीबीआयने अटक केली होती.

मनीष सिसोदिया हे सध्या तिहार जेलमध्ये आहेत. “सध्या आम्ही पोलीस
कोठडीची मागणी करत नाही. पण, भविष्यात पोलीस कोठडीची मागणी
केली जाऊ शकते. कारण, मनीष सिसोदिया हे साक्षीदारांना टार्गेट करण्याची
भीती असून त्यांचे आचरण योग्य नाही. न्यायालयाने वॉरंट जारी केल्यानंतर
सीबीआयने छापा टाकला होता, ” असे सीबीआयने न्यायालयात म्हटले आहे.
मनीष सिसोदिया यांना न्यायालयीन कोठडीदरम्यान औषधे, भगवत गीता,
डायरी आणि पेन ठेवण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
मनीष सिसोदिया यांना आपल्या विपश्यनेच्या कोठडीत ठेवण्याची विनंती
न्यायालयाने केली आहे. मनीष सिसोदिया यांना तुरुंगांच्या नियमानुसार
विचार व्हावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. मनीष सिसोदिया यांना आठ
तास बसवून एकच प्रश्न विचारला जात होता, असे सीबीआयने छळ केल्याचा
त्यांनी न्यायालयात म्हटले.

अधिक वाचा  शिवडी विभागाच्या वतीने भीममहोत्सव-२०२५ मोठ्या जल्लोषात संपन्न