पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या सरकारला प्रश्न करणाऱ्यांवर नेहमीच हल्ला केला जातो.
बीबीसीच्या बाबतीतही हेच झाले, अशी तोफ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डागली आहे.
राहुल गांधी सात दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर असून लंडनमधील इंडियन जर्नलिस्ट
असोसिएनशनने ‘इंडिया इनसाइट्स’अंतर्गत राहुल यांचा वार्तालाप आयोजित केला होता.
यावेळी बोलताना राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले.

मी नाही, मोदींनी देशाचा अवमान केला
पंतप्रधान मोदींनी परदेशात जाऊन स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांत काहीच झाले नसल्याचा
दावा केला आहे. मी केव्हाच अशा प्रकारे माझ्या देशाचा अपमान केलेला नाही आणि
करणारही नाही. 70 वर्षांत काहीच झाले नाही असा दावा मोदी करतात तेव्हा तो सर्वच
हिंदुस्थानींचा अपमान नाही का, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

अधिक वाचा  मोठी बातमी ! विनोद कांबळीच्या मदतीला गावस्कर धावले, प्रत्येक महिन्याला आयुष्यभर देणार इतकी रक्कम…

म्हणून बीबीसीला घेरले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समर्थक असेल तर त्याचे अंधपणे समर्थन केले जाते. याउलट
मोदी किंवा त्यांच्या सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांवर हल्लाबोल केला जातो. असाच प्रका
र ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीसोबत घडला आहे. बीबीसीने गुजरात
दंगलीवर डॉक्युमेंट्री बनवली असता हा अपप्रचार असल्याचा दावा करून त्याची
काsंडी केली गेली, अशी तोफ राहुल यांनी डागली.

पंतप्रधानपद नव्हे, भाजपचा पराभव हे लक्ष्य
राहुल यांना यावेळी ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का? असा प्रश्न विचारण्यात
आला असता ‘मी पंतप्रधानपदाचा उमेदवार असणे हा चर्चेचा विषय नाही. भाजप व
संघाला पराभूत करणे ही विरोधकांची मध्यवर्ती कल्पना आहे,’ असे उत्तर त्यांनी दिले.

अधिक वाचा  कोल्हापूरवाले निर्णय घेणार ‘भाजप पुणे’चा कारभारी कोण होणार! शहराध्यक्षपदी ब्राह्मण, मराठा की ओबीसी माळी चेहरा?