जगभरात मृत्यूचे तांडव करणारा कोरोना व्हायरसही लहान मुलांचे काही वाकडे करू शकला नव्हता.
परंतू पश्चिम बंगालमध्ये एका व्हायरसने करोडो पालकांच्या चिंता वाढविल्या आहेत. गेल्या ९ दिवसांत
बंगालमध्ये ४० हून अधिक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.
एडेनोव्हायरस (Adenovirus) मुळे गेल्या सहा तासात कोलकाताच्या हॉस्पिटलमध्ये चार
मुलांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी दोन मुलांचा मृत्यू झाला. यामध्ये एक १८ महिन्यांची
मुलगी आणि एक चार वर्षांचा मुलगा देखील आहे. याच बी.सी. रॉय चिल्ड्रन हॉस्पिटलमधून सायंकाळी
आणखी चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
हॉस्पिटलच्या सुत्रांनुसार चार मुलांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. परंतू त्यांची नावे जाहीर
करण्यात आलेली नाहीत. गेल्या १३ तासांत मृत पावलेल्या मुलांमध्ये ताप, खोकला आणि श्वास
घेण्यास त्रास आदी लक्षणे दिसली होती. त्यांच्यावर उपचार केला जात होता. परंतू ही मुले बरी होत नव्हती.

अधिक वाचा  तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससूनची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’

मुलांमध्ये एडेनोव्हायरस हे श्वसन आणि आतड्यासंबंधी संक्रमण करतात. 0-2 वर्षे वयोगटातील
आणि 2-5 वर्षे वयोगटातील मुलांना संसर्गाचा धोका जास्त असतो. 5-10 वर्षे वयोगटातील मुले
याला (संसर्ग) बळी पडण्याची शक्यता असते.

लक्षणं
एडेनोव्हायरस संसर्गाच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस सतत ताप येणे,
खोकला, घसा खवखवणे, सर्दी, अतिसार, उलट्या आणि जलद श्वास घेणे यांचा समावेश आहे.
या व्हायरसमुळे लहान मुले, आधीच श्वसन रोग आणि इतर गंभीर आजार असलेल्या लोकांना जास्तधोका धोका असतो.

उपचार
एडेनोव्हायरस फ्लूवर कोणताही इलाज नसला तरी, सौम्य लक्षणांवर ओआरएस,
सकस आहार आणि लक्षणात्मक काळजी घेऊन घरीच उपचार करता येतात. जर
ताप 3-5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास किंवा तुम्ही श्वासोच्छवास जलद
किंवा ताणतणाव घेत असल्यास, भूक न लागणे आणि दिवसातून पाचपेक्षा
कमी वेळा लघवी होत असल्यास, रुग्णालयात जा आणि स्वतःची तपासणी करा.

अधिक वाचा  झहीर खान आणि सागरिकाच्या घरी झाले छोट्या पाहुण्याचे आगमन, नाव आहे एकदम युनिक